आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये काेराेनाचा फैलाव वेगाने हाेत आहे. मृत्यू वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी स्मशानात रांगा दिसून येतात. परिस्थिती एवढी भयंकर असतानाही जिनपिंग सरकारला मात्र देशात निर्बंध नकाेत. म्हणूनच चीन सरकारने तीन वर्षांपूर्वीचे झीराे काेविड धाेरण केव्हाच साेडून दिले आहे. त्याचाच भाग म्हणजे ओमायक्राॅन व्हेरिएंट धाेकादायक नाही. ताे सामान्य तापेसारखाच आहे, असा दावा सरकार विविध माध्यमातून करू लागले आहे.
देशातील महामारीचे तज्ञ झाँग नानशान यांनी अलीकडे एक वक्तव्य केले आहे. ओमायक्राॅन सर्दीपेक्षा जास्त काहीही नाही. याच मानसिकतेतून विषाणूचा माेठा फैलाव हाेऊनही चीनने नागरिकांना त्यांच्या परिस्थितीवर साेडून दिले आहे. अधिकाऱ्यांचे वागणेही तसेच आहे. विषाणूचा भलेही फैलाव हाेऊ द्या, परंतु अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग, कारखान्यातील उत्पादन थांबले नाही पाहिजे असा अधिकाऱ्यांचा पवित्रा आहे. या धाेरणामुळेच शहरांत कामगारांना ते बाधित असले तरीही कामावर यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पश्चिम महानगर चाँगकिंग येथील सरकारी कर्मचाऱ्यांना अशाच सरकारी आदेशाची धास्ती बसली आहे. वेगळ्या लक्षणांच्या काेराेनामुळे बाधित असलात तरीही कामावर यावे लागेल, असे फर्मान काढण्यात आले आहे. पूर्व किनाऱ्यावरील मॅन्युफॅक्चरिंगचे हब अशी ओळख असलेल्या जेझियांगमध्ये अधिकारी म्हणाले, संसर्ग झालेला असला तरीही नागरिकांनी काम केले पाहिजे. त्यातच आता तज्ज्ञ म्हणाले, चीनचे झीराे काेविड धाेरण कधीही प्रभावी नव्हते. या निर्णयाने नव्या भयंकर लाटेचा धाेका केवळ लाेकांनाच नसून चीनच्या व्यापार क्षेत्रालाही फटका बसू शकताे. कदाचित नवे संकट संपूर्ण जगाला हादरा देणारे ठरू शकते. वुहानमधील संसर्गाच्या स्फाेटाने तीन वर्षे संपूर्ण जग जणू ठप्प झालेले हाेते. जिनपिंग सरकारने संपूर्ण काेराेनाच्या काळात कठाेर नवी धाेरणे लागू केली हाेती. तपासणी केली. लाेकांना बळजबरीने क्वॉरंटाइन केले. परंतु ७ डिसेंबरला सरकारने नियमांत शिथिलता दिली. सर्वकाही नियंत्रणात आहे, असे जाहीर केले. प्रत्यक्षात सरकारचा हा दावा फाेल ठरला.
तांडव : रुग्ण जमिनीवर, ताणातून डाॅक्टर बेशुद्ध
चीनमध्ये रुग्णालयात आत, बाहेर लाेकांची गर्दी दिसू लागली आहे. साेशल मीडियात झळकणारी छायाचित्रे व व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत. व्हिडिओ चाेंगकिंग शहरातील आहेत. एका फुटेजमध्ये रुग्णालयाच्या इमर्जन्सी कक्षात रुग्ण जमिनीवर सर्वत्र पडलेले दिसतात. दुसऱ्या बाजूला डाॅक्टर फरशीवरील रुग्णाला सीपीआर देत होते. एका अन्य व्हिडिओत डाॅक्टर रुग्णांची तपासणी करताना अचानक बेशुद्ध झाले. यावरून तणावातून डाॅक्टरांची झालेली स्थिती लक्षात येते.
दिशाभूल करण्याचे प्रयत्न : सरकार आकडे दडवतेय, दिवस-रात्र अंत्यसंस्कार
चीन सरकार काेराेनाचे आकडे लपवण्याचे काम करत आहे. मृत्यूचे आकडे दडवण्याचे नियमच जणू चीनने बदलले असावेत अशी स्थिती आहे. सरकारने नवे मार्गदर्शक तत्त्व जाहीर केले आहे. श्वासासंबंधी आजारांतून झालेल्या मृत्यूंनाच काेराेनामुळे मृत्यूच्या श्रेणीत नाेंदवले जाईल. बीजिंगमधील स्मशानात चाेवीस तास अंत्यसंस्कार हाेत आहेत. सामूहिक अंत्यसंस्कार सुरू झाले आहेत. परंतु काेराेनामुळे झालेल्या मृतांचे आकडे दरराेज केवळ ५-१० असे सांगण्यात येत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आकडे जास्त आहेत.
ट्रॅव्हल बॅनची मागणी : चीनमधून येणारे लोक व्हिडियो सोशल मीडियावर शेअर करत आवाहन करत आहेत. चीनवर संपूर्ण ट्रॅव्हल बॅन लावा. चित्रपट निर्माते तनुज गर्ग लिहितात, ‘चीनमध्ये व्हेरिएंटचा जास्त धोका आहे. त्यामुळे प्रोटोकॉल कडक केला जावा’.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.