आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीन झीराे काेविड धाेरणावर वाटचाल करत असला तरी या धाेरणामुळे जनतेचे कंबरडे माेडण्याची वेळ आली आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे जियान शहर. काही दिवसांपूर्वी जियानमध्ये काेराेनाचे नवे बाधित आढळून आले हाेते. त्यानंतर सरकारने २४ डिसेंबरपासून शहरात लाॅकडाऊन लागू केला हाेता. त्यामुळे १.३ काेटी नागरिकांवर घरातच कैद हाेण्याची वेळ आली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण करण्यात आले. क्वाॅरंटाइनमुळे हे लाेक जणू घरात कैद झाले आहेत. विलगीकरणातील लाेकांना जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ खरेदी करण्याचीही साेय राहिली नाही. अशा लाेकांच्या मदतीसाठी प्रशासनाने किंवा स्थानिक संस्थांनीही पुढाकार घेतला नाही. कुणीही पुढे आलेले नाही.
त्यामुळे या लाेकांनी आपली कैफियत साेशल मीडियातून मांडली. परंतु ही कैफियत समजल्यावर संधिसाधूंनी फायदा घ्यायला सुरुवात केली. ते क्वाॅरंटाइनमधील लाेकांकडून तांदूळ, भाज्यांसाठी माेठी वसुली करत आहेत. पैसे शिल्लक नसलेल्यांकडून संधिसाधूंनी महागड्या गॅजेट्सची लूट केली. गॅजेट्सच्या बदल्यात धान्य, खाद्यपदार्थ दिले जात आहेत. अशा प्रकारे सामान्यांची जाेरदार लूट सुरू झाली आहे. सामान्यांच्या लुटीची छायाचित्रे साेशल मीडियावर खुलेआम दिसू लागली आहेत. तएका तरुणाने तर तांदळाचे पाकीट मिळवण्यासाठी स्मार्टवाॅच दिली.
आदिम काळ पुन्हा येताेय असे वाटते, तरुणाची भावना
वस्तुविनिमय पद्धतीकडे बघून साेशल मीडियावर लाेकांनी संताप व्यक्त केला आहे. नाइलाज झाल्याने वस्तूंच्या बदल्यात वस्तू देण्याच्या जुन्या काळात गेल्यासारखे वाटत आहे, असे एका युजरने म्हटले आहे. ही स्थिती आदिम काळात परतल्यासारखी आहे. तेव्हा लाेक आशावादी हाेतेे. आता मात्र संधिसाधू लाेक दिसू लागले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.