आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसाच पैसा:ChatGPT मुळे एक व्यक्ती मालामाल, 3 महिन्यांत 28 लाखांहून अधिक कमावले; जाणून घ्या काय आहे प्रकरण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत काही महिन्यांपासून ChatGPT ची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण तुम्ही या चॅट जीपीटीच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावता येतो हे कधी ऐकले आहे का? नाही. तर मग ऐका, एका व्यक्तीने ChatGPT च्या माध्यमातून पैसे कमावण्याचा विचार केला आणि अवघ्या 3 महिन्यांतच त्याने 28 लाखांहून अधिकची रक्कम आपल्या खिशात टाकली.

या व्यक्तीची हा पराक्रम सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकजण इंटरनेटवर ChatGPT चा वापर कसा करावा हे सर्च करत असतात. लोकांच्या या गरजेचा या व्यक्तीने फायदा घेतला अन् लखपती झाला.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, ChatGPT हाताळण्यासंबंधी इंटरनेटवर अनेक कोर्स उपलब्ध आहेत. लान्स जंक यांनीही गत वर्षाच्या अखेरीस यासंबंधीचा एक ऑनलाईन कोर्स सुरू केला होता. हा कोर्स Udemy वर उपलब्ध आहे. त्यात लोकांना ChatGPT चा वापर कसा करावा हे शिकवण्यात येते.

काय आहे कोर्स व किती होते कमाई?

कोर्स सुरू केल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांतच लान्स जंक यांना 15000 विद्यार्थी मिळाले. वृत्तानुसार, लान्स जंकचा कोर्स ChatGPT Masterclass: A Complete ChatGPT Guide for Beginners वर 34,913 डॉलरचा (जवळपास 28.6 लाख रुपये) नफा दिसून येत आहे. ऑस्टिनमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ChatGPT चा वापर सुरू केला होता.

या व्यासपीठाच्या यशामुळे लान्स जंक यांचे लक्ष खेचल्या गेले. ते म्हणाले की, माझी हा बॉट सर्वांसाठी उपलब्ध करवून देण्याची इच्छा होती. मला येथे संधी दिसली. मी एक ऑनलाईन कोर्स सुरू केला. त्यात मला यश मिळाले. ChatGPT शिकण्यासाठी खूप स्कोप आहे.

लान्स म्हणाले की, 'लोकांच्या मनात ChatGPT विषयी भीती आहे. त्यामुळे मी त्यांना वॉर्म, उत्साही व अप्रोचिंग बनवण्याचा प्रयत्न केला.' ते पुढे म्हणाले - सुरुवातीच्या काळात मी बॉटवर अनेक तास घालवले. त्यातून हे बॉट कसे वापरावे व त्याचा लोकांना कसा फायदा होईल हे शिकलो.

कोर्स मध्ये काय खास?

ChatGPT वर लान्स जंक यांचा 7 तासांचा कोर्स आहे. त्याचे शूल्क 20 डॉलर्स आहे. त्यात 50 लेक्चर्सचा समावेश आहे. हे सर्व लेक्चर तयार करण्यासाठी जंक यांना 3 आठवडे लागले. त्याची सुरुवात ChatGPT प्रॉम्प्ट कसे लिहिलेले असतात यापासून होते. त्यानंतर बिझनेस, विद्यार्थी व प्रोग्रामर्ससाठी स्पेसिफिक ChatGPT अॅप्लिकेशन्सची माहिती सांगण्यात आली आहे.

चॅटजीपीटीसंबंधीची खालील बातमी वाचा...

चॅटजीपीटीचा 10 व्यवसायांना सर्वाधिक धोका:तज्ज्ञ म्हणाले- आत्तापासून कौशल्ये वाढवा, त्याला पर्यायी साधन म्हणून वापरा

सद्यस्थितीत तंत्रज्ञानाच्या जगात एका शब्दाने खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणजे 'ChatGPT', आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने सुसज्ज चॅटबॉट ChatGPT गेल्यावर्षी 30 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आला. जानेवारीमध्ये, त्याचे मासिक अॅक्टिव्ह वापरकर्ते 100 दशलक्ष झाले होते.

हे इंटरनेटच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारे ग्राहक अनुप्रयोग बनले. जानेवारीत दररोज 1.3 कोटी वापरकर्ते जोडले गेले. एवढा वापर करूनही खळबळ उडाली आहे. त्याचे कारण तरी काय? किंबहुना, अनेक व्हाईट कॉलर नोकऱ्यांना ChatGPT मुळे धोका आहे. शिक्षण संस्थेतही हा धोका नजीकच्या स्थितीत नसला तरी चिंतेचे वातारवण नक्की आहे.

ChatGPT ही क्रांती, ती येणारच ; उत्पादकता वाढेलवास्तविक, ChatGPT ला अनेक मर्यादा आहेत. कारण ते सद्या फक्त 2021 पर्यंत डेटा देते. निर्मात्याने ते स्वतःच्या आवडीनुसार बनवले आहे. म्हणजेच, त्याची माहिती पक्षपात करण्यास प्रवण आहे. तो चुकीची उत्तरेही देतो. त्यामुळे कमी विश्वासार्हता आहे. ChatGPTतून नवीन काही विकसित होत नाही. येथे वाचा संपूर्ण बातमी...