आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातले अनेक देश सध्या महागाईच्या कचाट्यात सापडले आहेत. यात जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असणारे देशही येतात. यातच श्रीमंत लोकांची संख्या वाढत आहे. भारतातही अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक आकडा जारी केला आहे. ज्यामध्ये जगातील टॉप 10 शहरे अशी आहेत, जिथे सर्वाधिक अब्जाधीश राहता. या यादीत भारताचाही समावेश आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार या यादीत चीनचे एक शहर आघाडीवर आहे. या यादीत अमेरिकेतील दोन शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे, भारतातील मुंबई शहर अब्जाधीश शहरांच्या यादीत 8 व्या क्रमांकावर आहे.
चीनचे बीजिंग शहर पहिल्या क्रमांकावर
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या यादीनुसार चीनचे बीजिंग शहर पहिल्या क्रमांकावर आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये 2.30 कोटींहून अधिक लोक राहतात आणि तेथील अब्जाधीशांची संख्या 100 आहे. अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची लोकसंख्या 84.7 लाख आहे, त्यापैकी अब्जाधीशांची संख्या 99 आहे.
जगातील टॉप 10 अब्जाधीश शहरांच्या यादीत हाँगकाँग तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे 80 अब्जाधीश राहतात. मॉस्को चौथ्या स्थानावर आहे आणि येथे 79 लोक राहतात. यानंतर चीनची आणखी तीन शहरे येतात. शेन्झेन पाचव्या क्रमांकावर आहे. जिथे 68 अब्जाधीश राहतात. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर शांघाय शहर आहे. जिथे 64 अब्जाधीश राहतात. चीनमधील आणखी एक शहर हांगझोऊ 10 व्या क्रमांकावर आहे. येथे 47 अब्जाधीश राहतात.
मुंबईत 48 अब्जाधीश
चीनच्या दोन शहरांनंतर ब्रिटनचे लंडन शहर 63 अब्जाधीशांसह या यादीत 7 व्या क्रमांकावर आहे. यानंतर भारतातील मुंबई शहराचा क्रमांक येतो, जिथे 48 अब्जाधीश राहतात. भारताबरोबरच अमेरिकेचे सॅन फ्रान्सिस्को 8 व्या क्रमांकावर असून येथे 48 अब्जाधीश वास्तव्याला आहेत.
चीन आणि अमेरिकेचे वर्चस्व
जागतिक आकडेवारीच्या या यादीत चीन आणि अमेरिका यांचे वर्चस्व आहे. अमेरिकेत दोन शहरे आहेत. तर चीनमधील चार शहरात जास्त अब्जाधीस आहेत. चीनमध्ये या चार शहरांमध्ये 279 अब्जाधीश आहेत. तर अमेरिकेच्या दोन शहरांमध्ये 147 अब्जाधीश राहतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.