आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाल हक्काच्या नावाखाली भारतासारख्या विकसनशील देशांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या अमेरिकेत मुलांच्या शोषणाची एक व्यवस्था तयार झाली आहे. अवैधरित्या आंतरराष्ट्रीय सीमापार करून अमेरिकेत पोहोचलेले मुले सर्वात स्वस्त मजूर आहेत. जी कामे अमेरिकी करणे पसंत करत नाहीत, ती या मुलांकडून करवून घेतली जात आहेत. ही मुलांना धोकादायक कारखाने, बेकरी, कत्तलखाने आणि बांधकामात जुंपले जाते. सर्वसाधारणपणे ही ठिकाणे शहरांपासून दूर असतात. शहरांजवळच्या भागात यांच्याकडून रात्रीच्या शिफ्टमध्ये कामे करून घेतली जातात. या बेघर मुलांना तेथेच झोपावे लागते. खाण्याची व्यवस्था न झाल्याने आणि प्रदूषित वातावरणात १२-१४ तास केल्यामुळे श्वसनविकारामुळे त्यांच्यावर मृत्यू ओढावणे सामान्य बाब आहे.
सुखकर आयुष्याच्या शोधात मेक्सिकोसारख्या शेजारी देश आणि मध्य अमेरिकेतून दरवर्षी अवैध पद्धतीने हजारो मुले अमेरिकेत येतात. मात्र, कोरोनानंतर ग्वाटेमाला, कोस्टारिका, होंडुराससारख्या मध्य अमेरिकी देशांची आर्थिक स्थिती एवढी खराब झाली की, पोट भरणेही खडतर झाले आहे. अशा स्थितीत या देशांतील कुटुंबे स्वत:हून मुलांना अवैधरित्या अमेरिकेत पाठवतात. २०२१ मध्ये दीड लाखापेक्षा जास्त मुले अमेरिकेत आली. ही संख्या कोरोनाच्या आधी अवैधरित्या अमेरिकेत येणाऱ्या मुलांपेक्षा पाचपट जास्त आहे.
मुलांकडून काम करून घेणाऱ्यांत व शोषण करणाऱ्यांत फोर्ड आणि जनरल मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. पकडल्यानंतर त्यांना १५ हजार डॉलरचा(१२ लाख रु.) दंड लावला जातो. हा या कंपन्यांसाठी काहीच नाही. या मुलांना कामावर ठेवणाऱ्या अनेक कंपन्याही उघडल्या आहेत. मोठ्या कंपन्या या स्टाफिंग कंपन्यांच्या माध्यमातून अवैध स्थलांतरीत मुलांना नियुक्त करतात. अशाच एका अमेरिकी कंपनीचे एचआर व्यवस्थाप म्हणाले की, अमेरिकेत सर्व कामासाठी कर्मचारी मिळत नाहीत,त्यामुळे स्टाफिंग एजन्सीकडून नियुक्ती केली जाते.
बालमजुरीची प्रणाली मुलांना हद्दपार केले जाऊ शकत नाही अमेरिकी कायद्यांनुसार, एखाद्या मुलाने एकट्याने अवैधरित्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून देशात प्रवेश केला असेल तर त्याला त्याचे पालक भेटेपर्यंत हद्दपार केले जाऊ शकत नाही. अशा मुलांसाठी अमेरिकेने निवारागृह स्थापन केले आहेत. मात्र, ते पुरेसे नाहीत.
सोशल मीडियाद्वारे इतर देशांतील मुलांना बोलावता स्टाफिंग कंपन्यांचे लोक सोशल मीडियाद्वारे अन्य देशांतील मुलांना अमेरिकेत चांगल्या संधीचे स्वप्न दाखवतात. त्यांना मदतीचा विश्वास दिला जातो. यानंतरही त्यांना लालूच देऊन अवैधरित्या सीमापार करण्यासाठी प्रेरित करतात. सीमापार झाल्यावर मुले जाळ्यात अडकतात.
युरोपमध्ये सुमारे २ कोटी मुले दारिद्र्यात जगताहेत बिगर सरकार संघटना सेव्ह द चिल्ड्रनच्या एका अहवालानुसार, २०२१ मध्ये युरोपात १.९६ कोटी मुले गरीब किंवा दारिद्र्याच्या उंबरठ्यावर आहेत. युरोपमध्ये दर चौथा मुलगा दारिद्र्यात ढकलले जाण्याच्या स्थितीत आहे. यामागे महागाई व महामारी हेे कारण सांगितल जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.