आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:बाेलण्यातून केलेला अपमान जिव्हारी लागू शकताे, परिणामही दीर्घकाळ, पण चांगल्या गाेष्टींचे विस्मरण

अॅमस्टरडॅमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यपणे बाेलताना एखाद्याला उद्देशून कठाेर शब्दांचा वापर झाल्यास त्याचे परिणाम दीर्घकालीन ठरतात. अपमानकारक गाेष्टी जिव्हारी लागतात. असे शब्द थापड लगावल्यासारखे वाटतात. नेदरलँडमध्ये यासंबंधीचे संशाेधन झाले. त्यात संशाेधकांनी प्रकल्पात सहभागींच्या मेंदूतील हालचालींची नाेंदणी केली. त्यात दाेन गट तयार करण्यात आले हाेते. एका गटातील लाेकांना अपमानजनक शब्दांनी बाेलण्यात आले. त्या दरम्यान मेंदूतील हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. दुसऱ्या गटाचे मात्र काैतुक करण्यात आले.

पहिल्या गटातील लाेक आपल्यासाठी वापरलेल्या अपमानजनक शब्दांना मनात वारंवार तीव्र भावनेतून आठवत हाेते, असे त्यात आढळून आले. यूट्रेक्ट विद्यापीठाचे डाॅ. स्ट्रुक्स्मा व त्यांच्या टीमने ७९ महिला सहभागींवर ईईजी व त्वचेसंबंधी इलेक्ट्राेड लावून प्रयाेगाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्यांना विशिष्ट वाक्यांची पुनरावृत्ती करण्यास सांगण्यात आले. त्यात कृतीचा अपमान, काैतुक व तटस्थता, तथ्यात्मकदृष्ट्या याेग्य वाक्यांचा समावेश हाेता. एखाद्या वक्तव्याचा परिणाम व्यक्तीवर हाेताे का याचा वेध घेण्याचा संशाेधकांनी प्रयत्न केला. वक्तव्यांच्या तीन सेटमधील निम्म्यावर सहभागींची नावे हाेती. सहभागींमध्ये वैयक्तिक स्वरूपाचे संभाषण मात्र नव्हते. सहभागींना ही वक्तव्ये तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी केल्याचे सांगण्यात आले हाेते.

माध्यम काही असले तरी अपमान हा सारखाच असतो शब्दांतून केलेला अपमान हा ताेंडावर थापड लगावल्यासारखा असताे. त्याचे ते छाेटेखानी रूप वाटते. एखाद्या व्यक्तीचा अपमान वारंवार विविध माध्यमांनी केल्यास सगळे प्रसंग सारखाच अपमान केल्यासारखे वाटतात.. कृत्रिम वातावरणात व काल्पनिक लाेकांनी केलेल्या वक्तव्याशी असेच घडते.

बातम्या आणखी आहेत...