आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक मुले भीती, चिंता आणि वेदनेसारख्या कारणांमुळे जागे असतात. अनेकदा त्यांच्या मेंदूत एकानंतर एक विचारचक्र सुरू राहते. अशात ते झोपेविना ताटकळतात. परिणाम जास्त थकवा आल्यानंतरही ते झोपू शकत नाहीत.
झोप आलेली असते, मात्र झोपू शकत नाही,असा विरोधाभास असतो. वास्तवात हे संकटात अस्तित्वाबाबत शरीराला जागृत ठेवण्याची प्रतिक्रिया आहे. मात्र, झोपेसाठी मेंदूत आरामाची गरज भासते. अशा स्थितीत मुलांना आई-वडिलांनी त्यांची भावना समजून त्यांच्याशी वर्तन करण्याची गरज असते. त्यात त्यांना रागावणे आणि आदेश देण्याऐवजी मुले झोपत नसतील तर प्रेमाने कुरवाळणे आणि गोड बोलणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरते. भावनात्मक थकवा तणावाचे एक रूप आहे, हे मुले आणि प्रौढ दोघांची झोप उडवून चिडचिडे करते. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास झोपेचा दबाव जेवढा जास्त असेल तेवढी झोप सुखकर होते. म्हणजे अंथरुणावर पडताच झोप येईल. नको असतानाही झोप येईल.
मेंदूत अँडिनोसायन्स केमिकल बनल्याने असे होते.हे एकप्रकारचे प्रोटीन आहे. जे झाेपल्यावर आपल्या मेंदूतून निघून जाते. आपण जागे होतो तेव्हा पुन्हा मेंदूत तयार व्हायला सुरुवात होते. मेंदूत याचे प्रमाण वाढते तेव्हा झोपेचा दबाव तयार होतो. प्रौढांमध्ये या प्रक्रियेस १४-१६ तास लागतात. मुले एक ते दोन तासात झोपण्यासाठी तयार होतात.
हळू बोलणे, गुणगुणणे, शांत भाव दाखवणे फायद्याचे मुलांना आरामदायक झोप येण्यासाठी मायेने जवळ घेणे, धापटणे खूप फायद्याचे असते. हळूहळू बोलणे, गीत गाणे, गुणगुणणेही त्यांच्या फायद्याचे ठरते. मुलांसमोर शांत भाव दिसल्यास ते लवकर झोपी जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.