आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग दांपत्यांची मुले लवकर परिपक्व हाेतात:संवेदनशीलदेखील असतात, इतर भाषा शिकतात

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग व्यक्तींची मुले जास्त परिपक्व असतात. त्यांच्या सहानुभूतीचा भाव जास्त असताे. त्याशिवाय ते संवेदनशीलही असतात. त्यामुळेच ते इतरांची भाषाही लवकर शिकू शकतात. कारण लहानपणापासून त्यांना पालकांशी संवादासाठी ते सांकेतिक भाषा शिकावी लागते. त्यांचे बालपण नेहमीच आव्हानात्मक असते. त्याचा फायदा त्यांना माेठे झाल्यावर हाेताे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या डेकन विद्यापीठातील पीएचडी करणारे रामास मेकरे यांनी साइन लँग्वेजचा मानसिक आराेग्यावर हाेणाऱ्या परिणामांचे अध्ययन केले. मूक बधिर आई-वडिलांच्या मुलांना लहानपणापासून अनेक गाेष्टी शिकाव्या लागतात. ते एखाद्याला सहजपणे घरी बाेलावू शकत नाहीत. त्यामुळे लहानपणीच त्यांना वेगळा एकटेपणा अनुभवावा लागताे. त्याचा उपयाेग ते आपल्या अभिव्यक्तीला जास्त प्रभावी करण्यासाठी करतात. माजी सामाजिक कार्यकर्ता शेल्डन पाॅल्टन म्हणाले, असे लाेक चेहऱ्यावरील हावभाव आणि आपल्या अनुभवाच्या आधारे आपल्या पालकांशी संवाद साधतात. काहीवेळा अशा गाेष्टी आवडत नाहीत. परंतु ही बाब नियमित झालेली आहे. बऱ्याचदा वेगवेगळ्या गरजांसाठी जास्त जागरुक हाेण्याची जबाबदारी दिली जाते. अशा दांपत्यांची मुले स्वत:ची जडणघडण फार वेगळ्या पद्धतीने करतात.

लहान वयातच जबाबदारीची जाणीव येते दिव्यांग मुलांना काही साेयी-सुविधा मिळतात. परंतु कमी वयातच त्यांना जबाबदारीची जाणीव हाेऊ लागते. त्यांच्यातील समर्पणाचा भाव जागृत हाेताे. कदाचित यातूनच ही मुले तुलनेने लवकर परिपक्व हाेत असावीत.

बातम्या आणखी आहेत...