आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वित्झरलंडमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. स्विस एजन्सी फॉर थेराप्युटिक प्रॉडक्ट्स (स्विसमेडिक) ने जारी केलेल्या माहितीनुसार, 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना फायझरचे व्हॅक्सीन देण्यास परवानगी मिळाली आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात सुद्धा झाली आहे.
1500 मुलांना लस टोचून झाला अभ्यास
स्विसमेडिकने आपल्या संकेतस्थळावर सांगितल्याप्रमाणे, फायझर-बायोएनटेकच्या अॅप्लीकेशनसह गोळा करण्यात आलेल्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. वैद्यकीय चाचण्यांमध्ये लहान मुलांना या व्हॅक्सीनचा कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. लहान मुलांना हे व्हॅक्सीन दिल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
लस टोचल्यानंतर सामान्य साइड इफेक्ट
स्वित्झरलंडच्या 1500 मुलांना लस टोचून त्या सर्वांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतरच फायझरचे व्हॅक्सीन 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. लसीकरण झाल्यानंतर मुलांमध्ये किंचित साइड इफेक्ट दिसून आले. त्यामध्ये लस टोचलेल्या ठिकाणी दुखणे, थकवा, डोकेदुखी, ताप आणि हात-पाय दुखणे इत्यादींचा समावेश आहे.
जगभरात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 14 नोव्हेंबर रोजी आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा हा व्हेरिएंट 59 देशांपर्यंत पोहोचला आहे. भारतात या व्हेरिएंटचे 30 रुग्ण असून त्यातील 17 एकट्या महाराष्ट्रात आहे. सद्यस्थितीला राज्य आणि केंद्र सरकारकडून शंभर टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच बूस्टर डोस देण्याची सुद्धा तयारी सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.