आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Children's IQ Levels Rise Faster When There Is Greenery Around Them, They Become More Sensible And Don't Behave Badly; Study Of Hasselt University, Belgium

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:आजूबाजूला हिरवाई असल्यास मुलांची आयक्यू पातळी वेगाने वाढते, ती जास्त समजूतदार होतात आणि वाईट वागतही नाहीत; बेल्जियमच्या हासेल्ट विद्यापीठाचा अभ्यास

लंडन3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • विद्यापीठाने 10 ते 15 वर्षे वयोगटातील 620 मुलांवर केला विशेष अभ्यास
  • हिरवळ, खुल्या वातावरणात राहणारी मुले कमी रागीट असतात : तज्ज्ञ

आजूबाजूला हिरवळ असलेल्या मुलांचा बुद्ध्यांक (आयक्यू पातळी) वेगाने वाढतो. अशा वातावरणात राहणारी मुले खूप समजूतदार असतात, ती वाईट वागतही नाहीत. बेल्जियमच्या हासेल्ट विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष निघाला आहे. हिरवा रंग मुलांच्या विकासात अनेक अर्थांनी सहायक ठरतो, याचे पुरावे पूर्वीपासूनच आहेत, पण ते पारखण्यासाठी प्रथमच असा अभ्यास झाला. मुलांच्या आयक्यूच्या पडताळणीसाठी १० ते १५ वर्षे वयोगटातील ६२० मुलांचा अभ्यास करण्यात आला. हिरवळीची उपग्रहाद्वारे प्रतिमा घेऊन केलेल्या अभ्यासात आढळले की, ज्या मुलांच्या आजूबाजूला हिरवळ जास्त आहे, त्यांचा आयक्यू स्कोअर सरासरीपेक्षा २.६ गुणांनी जास्त आहे. त्यांच्यात तणावाची पातळी कमी आढळली, शिवाय मुलांच्या शारीरिक हालचालीही जास्त होत्या आणि वातावरणही शांत होते.

पर्यावरणीय महामारी शास्त्राचे प्राध्यापक टिम नॉरो म्हणाले, “हिरवळीच्या भागातील मुलांचा सरासरी आयक्यू स्कोअर १०५ होता, पण ८० पेक्षा कमी गुण असलेल्या मुलांत ४% मुले हिरवळ कमी असलेल्या भागात वाढली आहेत. सामान्यपणे आयक्यू पातळी ९० ते ११० दरम्यान असते. ती १२५ ते १३० असेल तर मुलांना हुशार समजले जाते.’ ब्रिटनमधील अॅक्सेटर विद्यापीठाचे पर्यावरण मनोवैज्ञानिक डॉ. मॅथ्यू व्हाइट म्हणाले, मुलांची बुद्धिमत्ता व कार्यकुशलतेवर गुणसूत्रे आणि वातावरण यांचा सखोल परिणाम होतो. विशेषत: त्यांचा मेंदू आकार घेतो व नवीन गोष्टी ग्रहण करण्यास सर्वाधिक सक्रिय असतो तेव्हा. त्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. आयक्यू वाढीसाठी जास्त व्यायाम आणि कमी तणाव प्रभावशाली असतो. हिरवळीमुळे एकाग्रता वाढते. आयक्यू वाढीकरिता मुलांसाठी प्रेरक वातावरण तयार करणे जास्त गरजेचे आहे.

हिरवळ, खुल्या वातावरणात राहणारी मुले कमी रागीट असतात : तज्ज्ञ

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. पल्लवी जोशींच्या मते, हिरवळीत व खुल्या वातावरणातील मुले कमी रागीट असतात. बेल्जियममध्ये सूर्यप्रकाश कमी असल्याने तेथे नैराश्य जास्त असते. त्यामुळे तेथील मुले हिरवळीच्या भागात राहत असतील तर त्यांचा आयक्यू जास्त असण्याची शक्यता आहे.