आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Children's Memory Impaired Due To Excessive Noise On The Way To School, 23.5% Decline In Brain Development!

दिव्‍य मराठी विशेष:शाळेच्या मार्गावरील जास्त वर्दळ-गोंगाटामुळे मुलांची स्मरणशक्ती कमकुवत, मेंदू विकासात 23.5% घट!

माद्रिदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनमधील बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थच्या संशोधकांनी बार्सिलोनाच्या ३८ शाळांत शिकणाऱ्या मुलांवर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. ७ ते १० या वयोगटातील २ हजार ६८० मुलांवर झालेल्या संशोधनात गोंगाटाचे दुष्परिणाम म्हणून त्यांची स्मरणशक्ती क्षीण होते असा दावा करण्यात आला आहे. स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रमाण ११.५ टक्के आहे.

त्याचबरोबर कठीण कामे करण्याच्या क्षमतेतदेखील २३.५ टक्के घट होऊ शकते. त्यामुळे अभ्यासातील एकाग्रतादेखील ४.८ टक्क्यापर्यंत घटते. या प्रबंधाचे प्रमुख जॉर्डी सनयर म्हणाले, ध्वनी प्रदूषणाचा परिणाम किशोरावस्थेवर होतो. त्यातून स्मरणशक्ती प्रक्रियेवर परिणाम होतो. हे संशोधन लक्षात घेऊन भविष्यात शाळा कमी वर्दळीच्या ठिकाणी उभारल्या जायला हव्यात. बाह्य व अंतर्गत ध्वनी प्रदूषणाचे स्वतंत्र परीक्षण करण्यात आले. त्यात बाह्य भागातून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा परिणाम मुलांच्या खेळ कामगिरीवरदेखील दिसला. त्यांची कामगिरी घसरल्याचे पाहायला मिळाले. मैदानावर बाह्य गोंगाटाचा त्रास व्हायला नको. परंतु वर्गखोल्यातील गोंगाटाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. परंतु त्यांच्या स्मरणशक्तीवर मुळीच नाही, असा दावाही करण्यात आला आहे. संशोधन प्रकल्पातील डॉ. मारिया फॉस्टर म्हणाल्या, वर्गखोल्यातील ध्वनीची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असल्यास ही बाब न्यूरोडेव्हलपमेंटच्या दृष्टीने धोकादायक असते.

बातम्या आणखी आहेत...