आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Chile Change In The Constitution Of 40 Years Ago, The Majority Of The Movement That Has Been Going On For A Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिली:40 वर्षांपूर्वीच्या राज्यघटनेत होणार बदल, वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला बहुमत

सँटियागोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण अमेरिकी देश चिलीमध्ये आता नवीन राज्यघटना तयार केली जाणार आहे. येथे रविवारी झालेल्या बहुमत चाचणीत नवीन राज्यघटनेच्या समर्थनार्थ ७८.२४% लोकांनी मतदान केले. २१.७६% लोक ४० वर्षे तयार झालेल्या सध्याच्या राज्यघटनेच्या बाजूने आहेत. या बहुमत चाचणीत सुमारे १ कोटी ४० लाख लोकांनी मतदान केले. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर लोकांनी रस्त्यांवर उतरून जल्लोष केला. मोफत शिक्षण व सरकारी तिजोरीतून पेन्शनच्या मागणीसाठी हे आंदोलन झाले होते. राष्ट्राध्यक्ष सेबास्टियन पिन्येरा रविवारी म्हणाले, “चिलीतील नागरिकांनी स्वत: ही इच्छा वर्तवली आहे. नवीन राज्यघटनेच्या सहमतीसाठी निवड झालेल्या नागरिकांची राज्यघटना परिषदेवर निवड झाली आहे.’

मेट्रोच्या भाडेवाढीपासून सुरुवात : नवीन राज्यघटना तयार करण्याची मागणी गतवर्षी झालेल्या जनआंदोलनापासून होत आहे. मेट्रोच्या भाडेवाढीविरोधात हे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र यानंतर अनेक मागण्या यात जोडल्या गेल्या. हे आंदोलन गत ९ वर्षांत झालेल्या दोन मोठ्या आंदोलनांपैकी एक आहे. ऑक्टोबरमध्ये आंदोलन तीव्र झाले होते. यात ३० लोकांचा मृत्यू झाला होता. चिलीची सध्याची राज्यघटना लष्कर हुकूमशहा आगुस्तो पिनोचेट ( १९७३-९०) यांच्या काळात लिहिली गेली आहे.