आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटवेव्हमुळे चिलीच्या जंगलात आग, 13 जणांचा मृत्यू:35 हजार एकरात पसरली, अर्जेंटिना, ब्राझीलच्या 63 विमान आग विझविण्यासाठी गुंतले

​​​​​​​सॅंटियागो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिलीतील हवामान विभागाने पुढील काही काळ वातावरण गंभीर राहील, असा इशारा दिला आहे.

चिलीमध्ये उन्हाळ्यातील उष्णतांच्या लाटेमुळे (हीटवेव्ह) अनेक जंगलांना आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 14 हजार हेक्टर (35 हजार एकर) क्षेत्र जळून खाक झाले. राजधानी सॅंटियागोपासून 500 किमी अंतरावर असलेल्या सांता जुआना शहरात अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांसह 11 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऐरॉकेनियामध्ये आपत्कालीन मदतीसाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. यामध्ये एका पायलट आणि मॅकनिकचा मृत्यू झाला आहे.

फोटोतून पाहा येथील परिस्थिती

चिलीमध्ये आगीच्या 39 घटना घडल्या असून त्यात अनेक घरे जळून खाक झाली आहेत.
चिलीमध्ये आगीच्या 39 घटना घडल्या असून त्यात अनेक घरे जळून खाक झाली आहेत.
सांता जुआना शहरात अग्निशामक दलासह 11 लोकांचा मृत्यू झाला.
सांता जुआना शहरात अग्निशामक दलासह 11 लोकांचा मृत्यू झाला.
आगीमुळे महामार्गाचेही नुकसान झाले असून, त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास होत आहे.
आगीमुळे महामार्गाचेही नुकसान झाले असून, त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास होत आहे.
ला एरोकॅनियात आपत्कालीन मदत करणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
ला एरोकॅनियात आपत्कालीन मदत करणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.

राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी नोबल-बायोबायोला भेट दिली
चिलीतील जंगालांमध्ये वाढती आग पाहता अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या 63 विमानांचा ताफा आग विझवण्याच्या प्रयत्नात गुंतला आहे. राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी नोबल आणि बायोबायोला भेट देण्यासाठी शुक्रवारी तातडीने दाखल झाले. या दोन भागांची एकूण लोकसंख्या सुमारे 20 लाख आहे. बोरिक बायोबियोतील जनतेला म्हणाले की, अध्यक्ष म्हणून, माझे काम आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व संसाधने प्रदान करणे आहे. जेणेकरून लोकांना कमीत कमी अडचणी येतील.

बातम्या आणखी आहेत...