आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा संकट:चीन : 5 लाख लोकांवर वुहानसारखी सक्ती, अमेरिका : अनलॉक 2 आठवड्यांतच अपयशी

बीजिंगएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगातील दोन मोठ्या शक्ती पुन्हा संकटात

चीनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कम्युनिस्ट सरकारची झोप उडाली आहे. चीनमध्ये सलग येणाऱ्या संसर्गाच्या प्रकरणांमुळे प्रशासनाने कठाेर उपाय केले आहेत. बीजिंगपासून १५० किलोमीटर लांब हेबई प्रांतात वुहानसारखी सक्ती करण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार हा लाॅकडाऊन हिबेईच्या अॅनशिनमध्ये लावण्यात आला आहे. यामुळे सुमारे ५ लाख लोक प्रभावित होतील. गेल्या २४ तासांत बीजिंगमध्ये कोरोनाचे १४ नवे रुग्ण आढळले आहेत. जूनच्या मध्यात एका फूड मार्केटपासून सुरू झालेल्या संसर्गाची संख्या वाढून ३११ झाली आहे.अॅनशिनची नाकेबंदी केल्यानंतर प्रशासनाने सांगितले की, येथे लाॅकडाऊन कठोरपणे लागू केले जाईल. घरातून बाहेर निघण्यास बंदी असेल. आवश्यक कामे किंवा सेवांसाठी परवानगी असेल. 

घरासाठी साहित्य आणण्यासाठी दिवसभरात केवळ एक व्यक्ती, एकदाच बाहेर जाऊ शकेल. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला इमारत, एखादा समुदाय आणि एखाद्या गावात जाण्याची परवानगी नसेल. नव्या रुग्णांपैकी एक तृतीयांश प्रकरणे बाजारातील मटण आणि बीफशी जोडली जात आहेत. तेथे काम करणाऱ्यांना एक महिन्यासाठी क्वॉरंटाइन केले जात आहे. अॅनिशन काउंटीतून शिफंदी बाजारात गोड पाण्यातील मासे पुरवले जातात.दरम्यान, बीजिंगमध्ये शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. 

अॅरिझोनात पॉझिटिव्ह वाढण्याचे प्रमाण २०%

अमेरिकेतील अनेक राज्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉस एंजलिस काउंटीच्या अधिकाऱ्यांनुसार आता पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे प्रमाण ९% वर गेले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ते ५.८% होते. टेक्सास राज्यात हे प्रमाण १३% आहे. दोन आठवड्यांपूर्वी ७% होते. अॅरिझोना राज्यात मेनंतर रुग्ण वेगात वाढले आहेत. हे प्रमाण २०% आहे. जॉन थॉमस हाफकिन्स ब्लूमबर्ग सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीनुसार गेल्या दोन आठवड्यांत कोरोना प्रकरणांत ६५% वाढ झाली आहे.

रेस्तराँत बसून खाण्याने संसर्गाचा धोका वाढला

राज्यांनी अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात रेस्तराँ, बार व पब उघडण्याची सूट दिली होती. संसर्ग वाढण्याचे हेदेखील कारण मानले जाते. अनेक राज्यांच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे. मिशिगनच्या हार्पर रेस्तराँ आणि ईस्ट लॅन्सिंगच्या ब्रुअपमधून ७० पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. अलास्कातील रेस्टराँमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने अनेकांच चाचणी केली. कंसासमध्ये सलून, बारमधून कोरोना पसरला. लॉस एंजलिसमध्ये नाइट क्लबमधून १०० पेक्षा जास्त लोक तावडीत सापडले.

कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडात पुन्हा सक्ती

रुग्ण वाढल्यानंतर कॅलिफोर्नियाच्या ८ काउंटीत व्यावसायिक हालचाली थांबवण्याचे आदेश दिले आहेत.  ७ काउंटीत अनलॉकची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. टेक्सासमध्ये मेच्या सुरुवातीला अनलॉक सुरू झाला होता. मात्र, आता येथेही रेस्तराँ, बार बंद करण्यात आले. फ्लोरिडात तरुण मोठ्या संख्येने तावडीत येत आहेत, हे बघता बीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व राज्यांच्या प्रशासनाला फ्रीडम डे वीकेंडची चिंता आहे.

श्रीमंत देशांत अमेरिका सर्वाधिक प्रभावित

कोरोनामुळे जगातील सर्व देश त्रस्त आहेत. मात्र श्रीमंत देशांबद्दल बोलायचे तर सर्वाधिक परिणाम अमेरिकेवर झाला. इतर देशात अनलॉक नंतर रुग्ण किरकोळ वाढले. मात्र अमेरिकेत असे नाही. ट्रम्पसह अनेक राज्यांच्या गव्हर्नरांनी इशारा गंभीरपणे घेतला नाही. यामुळे बाधित २६ लाखांपेक्षा जास्त झालेत.

बातम्या आणखी आहेत...