आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:हीट वेव्हमुळे सर्वाधिक मृत्यू चीन आणि भारतात, वातावरण बदलामुळे उष्ण दिवस वाढले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पर्यावरणातील बदलही कोरोना विषाणू महामारीसारखा धोकादायक

सर्बियातील वर्कहोयान्स्क गाव. यंदा उन्हाळा सुरू होण्याच्या आधीपर्यंत जगभरात हे गाव आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेत मानवी लोकवस्तीचे सर्वात थंड ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. येथे -६७.८ अंशांपर्यंत तापमान खाली येते. मात्र, गेल्या जूनमध्ये या गावाने उलटा विक्रम केला. तेव्हा पारा ३८ अंशांपर्यंत वाढला आणि गाव आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेतील सर्वात उष्ण भाग झाले. उन्हाळ्यात येथे कमाल तापमान २० अंशांपर्यंत असते. म्हणजे किमान व कमाल तापमानात १०० अंशांचा फरक दिसून आला.

मेडिकल जर्नल लँसेटमध्ये प्रसिद्ध या प्रोजेक्टच्या अहवालानुसार तापणाऱ्या जगात पूर, प्रदूषण, आजारांचा फैलावसारखे धोके खूप वाढतात. मात्र, हीट वेव्ह सर्वाधिक धोकादायक सिद्ध होत आहे. विशेषत: वयस्करांसाठी. अहवालानुसार जगभरातील कोणत्याही भागात हीट वेव्हमुळे वयस्कर आणि आधीपासून गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या मृत्यूची शक्यता वाढते. अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी (२०१९ मध्ये) जगभरातील ६५ वर्षांच्या लोकांनी १९८६ ते २००५ च्या तुलनेत संयुक्तपणे हीट वेव्हचे २९० कोटी दिवस जास्त सहन केले. त्याने २०१६चा विक्रम मोडला. भारत आणि चीन हीट वेव्हमुळे सर्वाधिक प्रभावित होणारे देश आहेत. याला दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, या दोन्ही देशांची लोकसंख्या खूप जास्त आहे. दुसरे म्हणजे या भागात आधीपासूनच उष्णता जास्त आहे.

जगभरात उष्णतेमुळे होणारे मृत्यू वर्ष २०००च्या तुलनेत २०१८ मध्ये ५४ टक्के जास्त होते. २०१८ मध्ये हीट वेव्हमुळे ६५ वर्षावरील २.९६ लाख जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये ६२ हजार तर भारतात ३१ हजार मृत्यू झाले. इतर देशांपेक्षा जास्त. पश्चिमेतील देशांमध्ये जर्मनी आणि अमेरिका सर्वाधिक प्रभावित राहिले. दोन्ही देशांमध्ये २०१८ मध्ये हीट वेव्हमुळे २० हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले. तापणाऱ्या जगात आणखीही धोके आहेत. गेल्या वर्षी ३०२०० कोटी कामांचे तास हीट वेव्हमुळे वाया गेले. या शतकाच्या सुरुवातीच्या तुलनेत ते १०३०० तास जास्त आहेत. मोठ्या कृषी उद्योगांमुळे भारताच्या उत्पादकतेवर सर्वाधिक परिणाम झाला.

पर्यावरणातील बदलही कोरोना विषाणू महामारीसारखा धोकादायक
संशोधकांचे म्हणणे आहे की, वातावरणही कोरोनासारखे गंभीर आव्हान देऊ शकते. मात्र, त्याची तीव्रता कोरोनाच्या तुलनेत कमी आहे. हवामानात जास्त चढ-उताराच्या दिवसांची संख्या वाढल्यास त्याचा सर्वाधिक मारा लाेकसंख्येतील कोणत्या समुदायावर होईल हे देशांनी ओळखायला हवे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser