आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची मुजोरी वाढली:चीनने BBCच्या प्रसारणावर घातली बंदी; वृत्तवाहिनीने कोरोनाव्हायरस आणि उईगर महिलांवरील बलात्काराच्या प्रकरणांचा केला होता खुलासा

बीजिंग| लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • BBC मुद्दाम खोटे आणि अफवा पसरवत असल्याचा आरोप चीनने केला होता

चीन सरकार सत्य टाळत असल्याचे आणखी एक उदाहरण गुरुवारी समोर आले. शी जिनपिंग सरकारने BBC World News वर चीनमध्ये बंदी आणली आहे. अलिकडच्या दोन महिन्यांत BBC ने चीनशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण खुलासे केले होते. कोरोनाव्हायरसच्या बाबतीत चीन कशाप्रकारे जगापासून सत्य लपवित आहे, याबाबत त्यांनी आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले होते. यानंतर चीनमधील उईगर मुस्लिमांच्या नजरकैदेच्या शिबिरांमध्ये महिलांवर सामूहिक बलात्कार केला जात असल्याचे बीबीसीने गेल्या आठवड्यात आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते.

दुसरीकडे BBC मुद्दाम खोटे आणि अफवा पसरवत आहे, त्यांच्या बातम्यांत काही तथ्य नाही आणि हे चीनला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप चीनने केला आहे.

ब्रिटनसोबतच्या संबंधात तणाव

BBC वरील बंदीनंतर चीन म्हणाला की, 'या वृत्तसंस्थेने आमच्या देशातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. तथापि, या प्रकरणात एक गोष्ट अधिक संबंधित आहे. मुळात BBC ही ब्रिटनची संस्था आहे. ब्रिटनने नुकताच चीनी वृत्तवाहिनी CGTN चीनी सरकार आणि सैन्याच्या इशाऱ्यावरुन प्रोपेगंडा पसरवत असल्याचे सांगत तिचा परवाना नूतनीकरण करण्यास नकार दिला होता. हाँगकाँगसंदर्भात दोन्ही देशांमध्ये आधीच बरेच तणाव आहे.'

बोरिस जॉनसनच्या ब्रिटन सरकारने सप्टेंबरमध्ये चीनला मोठा झटका दिला होता. जॉनसन यांनी चीनची हुबेई कंपनीला 5जी नेटवर्कचा कॉन्ट्रॅक्ट देण्यास नकार दिला होता. विशेष बाब म्हणजे हुबेई आणि ब्रिटन यांच्यात प्रारंभिक करार झाला होता. मात्र हुबेईच्या माध्यमातून चिनी सैन्य आणि सरकार इतर देशांमध्ये हेरगिरीचे जाळे तयार करीत असल्याचे ब्रिटनने म्हटले होते. यानंतर ब्राझील, स्वीडन आणि कॅनडाने देखील हाच निर्णय घेतला होता.

चीन म्हणाला - आम्हाला आमच्या हिताची चिंता

BBC बंदीवर चीनने म्हटले की, 'आम्ही प्रसारणासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. ती मान्य करावीच लागतील. कोणालाही खोटे आणि अफवा पसरविण्याची परवानगी दिली जात नाही. आम्हाला आमच्या राष्ट्रीय हितांची चिंता आहे. याबद्दल कोणताही तडजोड केली जाणार नाही.'

दुसरीकडे BBC ने एका निवेदनात म्हटले की, चीन सरकारच्या या निर्णयामुळे आम्ही निराश झालो आहोत. मात्र हा त्यांचा नवीन निर्णय नाही. कारण बऱ्यात दिवसांपासून तेथील आंतरराष्ट्रीय हॉटेल्स आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी आमच्या चॅनेलचे टेलिकास्ट थांबले होते. आम्ही नेहमीसारखे निष्पक्ष रिपोर्टिंग करत राहू.

अमेरिकेने केला बंदीचा विरोध

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक रॉब म्हणाले - माध्यमांद्वारे सत्याचा आवाज रोखण्याचे हे षडयंत्र आहे. आम्ही या बंदीच्या विरोधात आहोत. तसेच आम्ही चीनच्या या निर्णयाचा विरोध करतो असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता नेड प्राइस म्हणाले.