आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णांमुळे चीनचे शांघाय हे सर्वात मोठे शहर सोमवारपासून 5 दिवसांसाठी बंद होणार आहे. या कालावधीत शहर प्रशासन मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करुन व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. चिनी सरकार शांघायनंतर देशाच्या पश्चिम भागातही 1 एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करणार आहे.
लोक घरांत कैद होतील, परंतु सर्वच नाही
कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या शांघायची लोकसंख्या 25 दशलक्ष एवढी आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला येथे कोरोनाने शिरकाव केला होता. आता येथे देशातील सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. शनिवारी शांघायमध्ये कोरोनाचे 2676 नवे रुग्ण आढळले. त्यानंतर प्रशासनाने येथे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. पण, ग्लोबल शिपिंग हब असणारे शांघाय पूर्णतः बंद होणार नाही. हे लॉकडाऊन केवळ सर्वसामान्य जनतेसाठी असेल.
लसीकरणाचाही झाला नाही फायदा
हाँगकाँग विद्यापीठाच्या एका अहवालानुसार, चीनची सिनोव्हॅक ही कोरोना प्रतिबंधक लस ओमायक्रॉन विरोधात पूर्णतः अपयशी ठरली आहे. या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. 2021 पर्यंत चीनच्या 1.6 अब्ज लोकसंख्येला सुमारे 2.6 अब्जांहून अधिक डोस देण्यात आलेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी 4500 हून अधिक नवे रुग्ण नोंदवले. हा आकडा शनिवारच्या तुलनेत अवघ्या 1 हजाराने कमी आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी 4790 व शनिवारी 5600 रुग्ण नोंदवण्यात आले होते.
जागतिक व्यापाराला बसणार फटका
या लॉकडाऊनमुळे पुडोंग, जे आंतरराष्ट्रीय विमानतळ व आर्थिक जिल्हा आहे, तेही बंद करण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून शहराचा पश्चिमेतील अर्धा भाग पुक्सी 5 एप्रिलपर्यंत बंद राहील. लॉकडाऊनच्या दोन्ही टप्प्यांतक नागरिकांना घरात थांबण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच नोकरदारांनाही वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना करण्यात आली आहे. टास्क फोर्सचे सदस्य वू फॅन यांनी शांघाय पूर्णपणे बंद करण्यात आले, तर पूर्व चिनी समुद्रात आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करणाऱ्या अनेक जहाजांना समुद्रात अधांतरी तरंगावे लागेल असे म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.