आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China Birth Rate Updates: Now Allowed To Give Birth To 3 Children In China; Dragon Changed Policy; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:चीनमध्ये आता 3 मुलांना जन्म देण्यास परवानगी; अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांमुळे घाबरलेल्या ड्रॅगनने बदलले धोरण

बीजिंग21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकसंख्येच्या ताज्या आकड्यांमुळे चीन घाबरला, गेल्या दशकात 5.38% च वाढली लोकसंख्या, जिनपिंग यांचा निर्णय

चीन सरकारने दोन मुलांच्या धोरणात बदल करत दांपत्यांना तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी दिली आहे. सोमवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. चीनचा घटता जन्मदर हे या निर्णयामागील मोठे कारण सांगितले जात आहे. तो सुधारण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या दूरगामी परिणामांमुळे सरकारला धोरणात बदल करावा लागला. या बदलामागची मोठी कारणे अशी आहेत...

२०२५ पासून लोकसंख्या घटण्याची शक्यता
चीनने अलीकडेच जनगणनेचे आकडे जारी केले तेव्हा गेल्या दशकात लोकसंख्या वाढ खूप कमी राहिल्याचे स्पष्ट झाले. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सनुसार, चीनची सध्याची लोकसंख्या १४१ कोटी आहे. घटत्या जन्मदरामुळे त्यात २०२५ पासून उल्लेखनीय घट होऊ शकते. कोरोनामुळे देशात गेल्या वर्षी १.२ कोटी मुलांचा जन्म झाला. हा आकडा १९६१ नंतर सर्वात कमी आहे. पॉलिटब्युरोने त्याआधारावरच हा निर्णय घेतला.

कुटुंबावरील वाढता खर्च
लोकसंख्याविषयक तज्ज्ञांच्या मते, नव्या धोरणानंतरही खूप सुधारणा होण्याची शक्यता नाही. पूर्व आशिया आणि युरोपात लहान कुटुंबांनाच प्राधान्य आहे. २०१६ मध्ये दोन मुलांना जन्म देण्याची सूट असूनही वाढ झाली नाही, कारण अनेक आई-वडील घरखर्च आणि मुलांना वाढवण्याचा वाढता खर्च पाहून कुटुंब वाढवण्यास तयार नव्हते. हाँगकाँगमधील चीन विद्यापीठाचे प्रा. विवियन झान म्हणाले की, नव्या धोरणाचा फायदा फक्त श्रीमंतांनाच होईल. मध्यम आणि निम्न वर्गातील लोकांना होणार नाही.

लिंग गुणोत्तरात असमानता
हाँगकाँग युनिव्हर्सिटीतील सेंटर ऑफ एजिंग सायन्सचे संचालक स्टुअर्ट बेस्टन यांच्या मते, चीनमध्ये लिंग गुणोत्तरात असमानता निर्माण झाली आहे. प्रजनन दर १९७० पासून घसरत आहे. गेल्या वर्षी महिलांच्या तुलनेत साडेतीन कोटी पुरुष जास्त होते. १९७९ मध्ये लागू केलेल्या ‘एक मूल धोरणा’च्या कठोर अंमलबजावणीचा हा परिणाम आहे.

घटते कार्यबल
देशात ८९.४ कोटी लोकांचे वय १५ ते ५९ वर्षांदरम्यान आहे, ते २०१० च्या तुलनेत ६.७९% कमी आहे. देशात ज्येष्ठांचे प्रमाण वाढणार आहे. त्यांची सेवा करण्यासाठी लोक नसतील आणि भविष्य निर्माणासाठी हात कमी होत जातील. देशाचा आरोग्य आणि सामाजिक देखरेखीचा खर्चही वेगाने वाढेल. गेल्या वर्षी १.२ कोटी मुलांचा जन्म, १९६१ नंतरचा सर्वात कमी आकडा

बातम्या आणखी आहेत...