आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China Builds Villages In Bhutan, Adjacent To Arunachal Pradesh, Builds Military Bases And Power Plants

भूतानमध्ये चीनची घुसखोरी:अरुणाचलला लागून असलेल्या भूतानमध्ये चीनने गाव वसवले, येथे सैन्य तळ आणि पॉवर प्लांटही बांधला

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने भूतानपासून 8 किमी अंतरावर ग्यालाफुग नावाचे गाव स्थापित केले असल्याचा दावा ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केला आहे. येथे चीनने रस्ते, इमारती आणि पोलिस ठाणे आणि सैन्य तळ बांधले आहे. गावात पॉवर प्लांट, एक गोदाम आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे कार्यालयही आहे.

एका रिसर्च जनरलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत ऑस्ट्रेलियन माध्यमांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, चीन व्याप्त ग्यालाफुग गावात 100 हून अधिक लोक आणि एवढेच याक आहेत. बांधकाम कामगारांचे येथे येणे-जाणे सुरु राहते.

अहवालानुसार, हा परिसर भारतातील अरुणाचल प्रदेशाशी जोडलेला आहे आणि चीन अरुणाचलवरही दावा करत आला आहे. यामुळे असे मानले जाते की भूतानची जमीन हडपण्यामागील खरे लक्ष्य भारत आहे.

दोन्ही देशांमध्ये 470 किमी लांबीची बॉर्डर
ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या अहवालानुसार, चीनला हे चांगलेच माहिती आहे की, भूतान 1 अब्ज 40 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनचा विरोध करू शकणार नाही. चिनी सैनिकांनी येथे मोठे बॅनर लावले आहे. त्यावर 'शी जिनपिंगवर विश्वास ठेवा.' असे लिहिले आहे. सीमेवरील वादाबाबत दोन्ही देशांमध्ये अलीकडे कुणमिंग शहरात 25 बैठका झाल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये 470 किमी लांबीची सीमा आहे. तथापि, सीमा सामायिकरणाबाबत भूतान आणि चीनचे वेगवेगळे युक्तिवाद आहेत.

बातम्या आणखी आहेत...