आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीन पुन्हा एकदा गलवान संघर्षात वापरलेली तीक्ष्ण आणि टोकदार शस्त्रे खरेदी करत आहे. अशाच एका शस्त्राचा फोटो चिनी सोशल मीडिया अॅप 'वीबो'वर व्हायरल झाला आहे. फोटोत एक सैनिक काटेरी शस्त्र हातात धरलेला दिसत आहे. या शस्त्राला 'कम्बाइंड मेस' असे म्हटले जाते. हे 'कोल्ड वेपन' श्रेणीतील शस्त्र आहे.
14-15 जून 2020 च्या मध्यरात्री गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चिनी सैन्याने या श्रेणीतील शस्त्रे वापरली होती. 'कम्बाइंड मेस' हे धातूपासून बनवलेले शस्त्र आहे, हे भाल्यासारखे किंवा रॉडप्रमाणे दिसते. त्यांची लांबी 1.8 मीटर आहे. एका टोकदार हातोड्यासारखा हे शस्त्र दिसून ते सुमारे 50 सेंटीमीटरचे आहे. त्याला काटे जोडलेले आहेत. दुसरे टोकही धारदार असून तो भाल्यासारखा दिसतो.
चिनी सैन्य वाढवत आहे हँड-कॉम्बॅट शस्त्रास्त्रांची खरेदी
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, चीन भारत-चीन सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा जी-20 च्या माध्यमातून भारताशी राजनैतिक संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू हँड-कॉम्बॅट शस्त्रास्त्रांची खरेदी करणे नाकारू शकत नाही. या शस्त्रांचा वापर चीन पुन्हा भारतीय सैनिकांविरुद्ध करू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. चीन पुन्हा गलवानसारखा हल्ला पुन्हा करू शकतो. गलवान येथे झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते.
चीनने 2600 मेस खरेदी केल्याचा अहवाल
चीनने जवळपास 2600 'कम्बाइंड मेस' खरेदी केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. अहवालानुसार, चीनने जानेवारी 2023 मध्ये मेस आणि एकत्रित मेस खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली होती. ही शस्त्रे फेब्रुवारीत खरेदी करण्यात आली होती. खुद्द चिनी लष्करानेच याची घोषणा केली होती. त्याचवेळी, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने तियानजिन शहरातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी अशाच प्रकारच्या शस्त्रांचा वापर केल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.
गलवानमध्ये भारताचे 20 शहीद, चीनचे 38 सैनिक मारले
15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन सैन्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले, तर 38 चिनी सैनिक मारले गेले. मात्र, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केवळ 4 सैनिक मारले गेल्याचे मान्य केले. सुमारे तीन तास ही चकमक चालली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.