आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनचे सर्वात मोठे वेब पोर्टल क्यूक्यूडॉटकॉमवर चिनी शब्द ‘पिनकुन’ म्हणजे गरिबी हा कीवर्ड सर्च केल्यास अशा बातम्या समोर येतात... ‘गरिबी हे अमेरिकेतील मृत्यूचे चौथे मोठे कारण आहे.’ याची दुसरी बाजू पाहूया. एक निवृत्त वृद्ध बाजारात जातो. त्याच्याकडे पेन्शनचे सुमारे १,२०० रुपये आहेत. उत्पन्नाचा एकमेव स्रोत. यातून किराणा खरेदी केल्यास महिनाभराचा उर्वरित खर्च कसा भागणार? त्याची हतबलता दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होतो. पण तो हटवण्यात आला आहे.
वस्तुत: राष्ट्रपती जिनपिंग यांनी २०२१ मध्ये गरिबीविरोधातील युद्धात व्यापक विजयाची घोषणा केली. तरीही देशातील बहुतांश लोक गरीब आहेत किंवा दारिद्य्ररेषेच्या थोडेसे वर आहेत. आर्थिक शक्यता मंदावणे, भविष्याच्या चिंतेसह गरिबी हा विषय चीनमध्ये वर्जित झाला आहे. त्यावर चर्चा करणे सरकारला पसंत नाही. चीनचे इंटरनेट नियामक सायबरस्पेस प्रशासनाने नुकतेच सांगितले की, सरकारची प्रतिमा खराब करणारे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या लोकांवर आम्ही कारवाई करू. नैराश्य, ध्रुवीकरणासाठी भडकावणे किंवा आर्थिक-सामाजिक विकास रोखणाऱ्या व्हिडिओंबाबतही हीच भूमिका राहील. याअंतर्गत वृद्ध, दिव्यांग व मुलांच्या निराश दिसणाऱ्या व्हिडिओंवर बंदी घातली. स्वत:ला सकारात्मक दाखवणे हा सरकारचा उद्देश आहे.
चीनमध्ये सेन्सॉरशिपचा मुद्दा नवा नाही. १९८९ चा नरसंहार असो वा उइगर मुस्लिमांवरील अत्याचार. याच्याशी संबंधित बातम्या कधीच जगासमोर येत नाहीत. प्रचलित मीडिया प्लॅटफॉर्मच्या जागी स्थानिक सोशल मीडिया आहे. जेणेकरून आवश्यक गोष्टी व्हायरल होऊ नयेत. सर्च इंजिनही चीनचेच आहे. हार्वर्ड विद्यापीठातील मारग्रेट रॉबर्ट्स यांनी आपल्या पुस्तकात याचा गौप्यस्फोट केला होता.
‘चेहऱ्यापेक्षा माझा खिसा स्पष्ट...’ हे गाणे गायल्याने सोशल मीडिया अकाउंट निलंबित
ऑनलाइन सक्रिय राहणारे हू चेनफेंग यांनी १,२०० रुपयांत घरखर्च भागवणाऱ्या वृद्ध महिलेचा व्हिडिओ शेअर केला असता त्याचे अकाउंट डिलीट करण्यात आले. नुकतेच एका गायकाने तरुण, सुशिक्षितांची आर्थिक स्थिती, नोकरीची चिंता व कष्टाच्या कामाबाबतची हतबलता दाखवणारा व्हिडिओ बनवला...‘मी रोज चेहरा धुतो, पण माझा खिसा माझ्या चेहऱ्यापेक्षा जास्त स्पष्ट आहे. मी अन्नदानासाठी नव्हे तर चीनच्या विकासात मदत करण्यासाठी कॉलेजला गेलो होतो.’ त्याच्या या गाण्यावर बंदी घातली. सोशल मीडिया अकाउंट्सही निलंबित केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.