आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन:दांपत्याने जास्त मुले जन्मास घालावीत म्हणून 7 वर्षांपर्यंतच्या मुलांना परीक्षा द्यायची गरज नाही

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने शालेय यंत्रणेत मोठे बदल लागू केले आहेत. यात सहा व सात वर्षाच्या मुलांसाठी लेखी परीक्षेवर बंदी घालण्यात आली आहे. मुले व पालकांवरील दबाव करणे त्याचा हेतू आहे. सोमवारी जाहीर नव्या दिशानिर्देशांत म्हटले आहे, वारंवार होणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर जास्त दबाव यायचा. तो शिक्षण मंत्रालयाने काढून टाकला आहे. मंत्रालयाने सांगितले की, कमी वयातच विद्यार्थ्यांवरील दबाव त्यांच्या मानिसक व शारीरिक आरोग्याचे नुकसान करते. तसेच कनिष्ठ विद्यालयापर्यंत होणाऱ्या परीक्षाही कमी केल्या आहेत. हे उपाय चीनच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोठ्या बदलांचे भाग आहेत.

याआधी जुलैच्या अखेरीस चीनने सर्व खासगी ट्यूटरिंग फर्मवर बंदी घातल्याने १०० बिलियन डॉलरचा कोचिंग उद्योग प्रभावित झाला. याचा हेतू शिक्षण असमानता कमी करणे आहे, काही आई-वडील स्वेच्छेने त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत टाकण्यासाठी खासगी शिक्षणावर दरवर्षी १५४०० डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करतात. या सुधारणा कार्यक्रमांना चीनच्या जास्त मुलांच्या लोकसंख्या धोरणाशी जोडले जात आहे. अनेक दशकात धिम्या लोकसंख्या वाढीमुळे चीनच्या अधिकाऱ्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दोन मुलांच्या जन्माची मर्यादा हटवली व जास्त मुले जन्मास घालण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

पहिली-दुसरीच्या वर्गातील मुलांच्या गृहपाठावरही बंदी
बीजिंग शहरातील अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली की, काही शाळांमध्ये अव्वल गुणवत्तेची एकाग्रता रोखण्यासाठी शिक्षकांनी दर सहा वर्षांनी शाळा बदलायला हवी. या वर्षी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी गृहपाठावरही बंद घातली होती.

बातम्या आणखी आहेत...