आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चिकनमध्ये कोरोना:चीनचा दावा- ब्राझीलवरुन आलेल्या चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला, काही दिवसांपूर्वी इक्वाडोरच्या झींग्यातही व्हायरस आढळला होता

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वुहानच्या सी फुड मार्केटमधून कोरोना संक्रमण जगभरात पसरले

चीनने ब्राझीलमधून आलेल्या फ्रोजन चिकनमध्यो कोरोना व्हायरस मिळाल्याचा दावा केला आहे. मागच्या आठवड्यात इक्वाडोरवरुन चीनमध्ये पाठवलेल्या समुद्री झींग्यातही कोरोनाचे संक्रमण असल्याचे म्हटले जात होते. चीनने जूनमध्ये ब्राझीलसह इतर काही देशातून येणाऱ्या मांसाच्या आयातीवर बंदी घातली होती. परंतू, नंतर ही बंदी हटवण्यात आली.

शेंजेनच्या लोकल डिजीज कंट्रोल सेंटर (सीडीसी) ने नियमित तपासणीदरम्यान ब्राझीलवरुन आलेल्या चिकनचे सँपल घेतले होते. परीक्षण केल्यानंतर चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळला. ब्राझीलवरुन चिकनसोबत आलेल्या दुसऱ्या मीट प्रोडक्टरचे सँपल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप ब्राझीलने यावर कोणतीच प्रतिक्रीया दिली नाही.

नागरिकांना सावध राहण्याचा इशारा

शेंजेन सीडीसीने दुसऱ्या देशातून आलेले फूड प्रोडक्ट खाताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. जूनमध्ये चीनची राजधानी बीजिंगच्या शिनफॅडी सीफूड मार्केटमधून संक्रमणाची प्रकरणे समोर आली होती. तेव्हापासून सरकार विविध फुड प्रोडक्टचे सँपल घेऊन परीक्षण करत आहे.

वुहानच्या सी फूड मार्केटमधून संक्रमण पसरल्याचा संशय

चीनच्या वुहान शहरातून जगभरात कोरोना व्हायरस पसरला. संशय आहे की, संक्रमण वुहानमधील सी फूड मार्केटमधून पसरला. या मार्केटमध्ये वटवाघुळासह साप आणि इतर अनेक प्राण्यांचे मांस विकले जाते.

0