आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनने तैवानच्या सीमेलगत सलग दुसऱ्या दिवशी युद्ध सराव सुरू केला आहे. यावेळी चीनच्या लढाऊ विमानांनी पुन्हा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली. तैवानी संरक्षण दलाच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी काही चिनी फायटर जेट्स व युद्धनौकांनी तैवान स्ट्रेटची मीडियन लाइनचे उल्लंघन केले. ते हेतुपुरस्सर तैवानच्या सागरी हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही खबरदारी म्हणून क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा सक्रिय केली आहे. आमची चीनच्या कुरापतींवर करडी नजर असून, मॉनिटरिगसाठी काही विमाने व युद्धनौकाही पाठवल्या आहेत.
चिनी लष्कर तैवान लगतच्या 6 भागांत लष्करी सराव करत आहे. लष्करी सरावाच्या पहिल्या दिवशी चीनच्या 100 हून अधिक लढाऊ विमानांनी तैवानच्या उत्तर, दक्षिण-पश्चिम व दक्षिण पूर्व भागातील हवाई क्षेत्रात उड्डाण केले होते.
लष्करी सरावाचे कारण
अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीन व तैवानमधील तणाव वाढला आहे. 2 ऑगस्ट रोजी पेलोसी तैवानला पोहोचल्या होत्या. त्या परत जाताच चीनने तैवानलगत 4 ऑगस्ट रोजी लष्करी सरावाला सुरूवात केली.
जपानला कशा पोहोचल्या नॅन्सी?
नॅन्सी तैवानच्या भेटीनंतर जपानला पोहोचल्या. तिथे त्यांनी चीनच्या लष्करी कवायतींचा तिखट शब्दांत निषेध केला. त्या म्हणाल्या -अमेरिकन अधिकाऱ्यांना तैवानच्या दौऱ्यावर जाण्यास मज्जाव करून चीन तैवानला एकटे पाडू शकत नाही. आम्ही तैवानला आयसोलेट होऊ देणार नाही. अमेरिका चीनला असे करण्यापासून थांबवेल.
गुरूवारी 11 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले
हा युद्ध सराव 7 ऑगस्टपर्यंत चालेल. लष्करी सरावाच्या पहिल्या दिवशी चीनच्या 100 हून अधिक फायटर जेट्सनी तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली. तसेच 11 डोंगफेंग बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही मारा केला.
नकाशावरुन जाणून घ्या कुठे सुरू आहे लष्करी सराव
चीनने या लष्करी सरावाला लाइव्ह फायरिंग असे नाव दिले आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनुसार, हा युद्ध सराव तैवानच्या किनारपट्टीपासून अवघ्या 16 किमी अंतरावर सुरू आहे. यात प्रत्यक्ष दारुगोळ्याचा वापर केला जात आहे. चीन आतापर्यंत हा युद्ध सराव तैवानपासून जवळपास 100 किमी अंतरावर करत होता. पण नॅन्सी पेलोसींच्या दौऱ्यानंतर त्याने आता तैवानच्या किनारपट्टीलगत हा सराव करण्यास सुरूवात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.