आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची चाल:‘जलयुद्धा’च्या चिनी षड‌्यंत्रावर भारताचे पाणी, ईशान्येत प्रकल्पांच्या कामांना वेग

सत्यनारायण मिश्र |इटानगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरुणाचलजवळ सर्वात मोठे धरण उभारणीचा ड्रॅगनचा घाट चीन जास्त विसर्ग करून भारत व बांगलादेशात कृत्रिम पूर आणू शकतो

ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहाला मनमानी पद्धतीने वळवण्याचे काम चीन ११ वर्षांपासून करत आहे. परंतु या वेळी चीनने मोठी चाल खेळली आहे. अरुणाचलमध्ये एलएसीपासून केवळ ३० किमीवर चीन सर्वात मोठा प्रकल्प बांधत आहे. हा प्रकल्प चीनच्या सध्याच्या सर्वात मोठ्या जॉर्ज धरणाहूनही थोडा मोठा असेल. त्याची उंची १८१ मीटर तर रुंदी अडीच किमी असेल. लांबीची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. ६० हजार मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेले हे धरण मेडॉग सीमेजवळ तयार होणार आहे. याच ठिकाणाहून ब्रह्मपुत्र नदी भारतात प्रवेश करते. चीनचा डाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने ब्रह्मपुत्रवरील प्रस्तावित तीन प्रकल्पांच्या कामांना वेग देण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. या योजनेंतर्गत चार मोठे जलप्रकल्प उभारले जातील. त्यापैकी एका प्रकल्पाला अद्याप केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांकडून मंजुरी बाकी आहे. सूत्रानुसार आगामी काही दिवसांत पर्यावरणासंबंधी आवश्यक मंजुरी मिळेल. कारण चीन ‘जलयुद्धा’तून हानी पोहोचवू शकतो. हे तीन प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल. दोन प्रकल्पांचे काम सुरू आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्याबद्दलची सविस्तर माहिती जाहीर केली जात नाही.

चीनमध्ये ब्रह्मपुत्रेवर ११ वर्षांत ११ जलविद्युत प्रकल्प : चीनने ब्रह्मपुत्र नदीवर सर्वात मोठा प्रकल्प जांग्मू उभारला. तिबेटच्या ८ शहरांतही चीन वेगाने धरणांची उभारणी करू लागला आहे. त्यापैकी काही तयार झाले आहेत. बायू, जिशी, लांग्टा, दाप्का, नांग, डेमो, नामचा, मेतोक या शहरांत हे प्रकल्प उभारले जात आहेत.

जगातील सर्वात उंच ठिकाणावरून वाहणारी ब्रह्मपुत्र ईशान्य भारतातून बांगलादेशमार्गे समुद्राला मिळते. यादरम्यान ८८५८ फूट खोल खोरे बनलेले आहे. चीन कधीही धरणाची दारे उघडून कृत्रिम पूर आणू शकतो, अशी भारत-बांगलादेशला चिंता वाटते. या भागात मोठ्या प्रमाणात जलविद्युत असूनही चीन सर्वात मोठा प्रकल्प उभारू लागला आहे.

चीनच्या कुरापती रोखण्यासाठी भारताचे तीन प्रकल्प
ब्रह्मपुत्रची उपनदी सुबनसिरीवर उभारला जातोय ग्रॅव्हिटी प्रोजेक्ट

सुबनसिरी जलविद्युत प्रकल्प आसाम व अरुणाचलच्या सीमेवर सुबनसिरी नदीवर निर्माणाधीन स्थिती आहे. हा ग्रॅव्हिटी प्रोजेक्ट आहे. सुबनसिरी नदी तिबेटच्या पठाराहून वाहते आणि अरुणाचलच्या मिरी डोंगरादरम्यान भारतात प्रवेश करते. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, यंदाच्या मध्यापर्यंत २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होईल. या प्रकल्पात १३६५ दशलक्ष घन मीटर जलक्षमता असेल. धरण १६० मीटर उंच असेल. यामुळे पूर रोखणे शक्य होईल. अतिशय कमी वेळेत हा प्रकल्प रिकामा करता येऊ शकेल. सिंचनही शक्य आहे.

कामेंगमध्ये ८० किमी क्षेत्रात २ प्रकल्प , ८२०० कोटी खर्च
हे प्रकल्प अरुणाचल प्रदेश जलविद्युत प्रकल्पांतर्गत आहेत. त्यात ११ हजार मेगावॅट विद्युत तयार केली जाईल. एकूण खर्च ८२०० कोटी रुपये येईल. पश्चिम कामेंगमध्ये ८० किमी क्षेत्रात ते उभारले जाईल. १५० मेगावॅटच्या चार युनिटचे दोन प्रकल्प आहेत.

दिबांग प्रकल्पाला मंजुरीची प्रतीक्षा, पूर थाेपवता येणार
तज्ज्ञांच्या समितीने २८८० मेगावॅटच्या प्रकल्पाचा फायनल फिजिबिलिटी अहवाल जल मंत्रालयास सोपवला. त्याला लवकरच मंजुरी मिळू शकते. यातून पूर थोपवता येईल. जीवितहानीही रोखता येईल.

बातम्या आणखी आहेत...