आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन हटवताच चीनमध्ये वाढला कोरोना:डॉक्टरांनाही लागण, सरकार म्हणाले- ओमिक्रॉन धोकादायक नाही, म्हणूनच निर्बंध शिथिल

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये झीरो-कोविड पॉलिसीच्या विरोधात निदर्शने झाल्यानंतर सरकारने शिथिलता आणली आणि लॉकडाऊन हटवला आहे. परंतु आता येथे परिस्थिती आणखी बिकट होताना दिसत आहे. रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची गर्दी झाली आहे. एवढेच नाही तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होत आहे. काही डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असूनही रुग्णांवर उपचार करत आहेत.

दरम्यान, 2 वर्षांपासून कडक कोरोना नियम लागू करणाऱ्या चीन सरकारने यू-टर्न घेतला आहे. आता अधिकारी म्हणतात की, कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार धोकादायक नाही. सरकारसुद्धा लोकांना सेल्फ केअरबद्दल सांगत आहे. म्हणजेच कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. लोकांनी स्वतःची काळजी घेतल्यास संसर्ग टाळता येऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

चीनचे जिनपिंग सरकार कोरोनाला गंभीर धोका असल्याचे सांगून गेल्या महिन्यापर्यंत निर्बंध हटवत नव्हते.
चीनचे जिनपिंग सरकार कोरोनाला गंभीर धोका असल्याचे सांगून गेल्या महिन्यापर्यंत निर्बंध हटवत नव्हते.

बाधित वैद्यकीय कर्मचारीच करत आहेत उपचार

लॉकडाऊन हटवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका डॉक्टरांना बसत आहे. रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची रांग लागली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टरांना संसर्ग झाला आहे. एका वैद्यकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात सांगितले की, संक्रमित असूनही त्यांना काम करायला लावले जात आहे.

चीनमध्ये काय चालले आहे...

  • एकीकडे, सीसीपीची सर्वोच्च रँकिंग असलेली एकमेव महिला आणि चीनमध्ये कोरोनाशी लढा देणाऱ्या समितीच्या प्रमुख सुन चुनलान म्हणतात की, देशात कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार कमकुवत झाला आहे. आता यापासून कोणताही धोका नाही. तर दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
WHOच्या मते येथे दररोज 20 हजारांहून अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. 14 डिसेंबर रोजी 22,804 रुग्ण आढळून आले होते.
WHOच्या मते येथे दररोज 20 हजारांहून अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. 14 डिसेंबर रोजी 22,804 रुग्ण आढळून आले होते.
  • अॅडव्हायजरी जारी करून सरकार कोरोनाचा धोका नगण्य असल्याचे सांगत आहे. एखाद्याला कोरोना झाला तरी ते घरात आयसोलेशनमध्ये राहू शकतात. पॉझिटिव्ह असूनही त्यांना कोरोनाची फारशी लक्षणे दिसणार नाहीत. म्हणूनच घाबरण्याची गरज नाही.
  • धोका कमी असल्याचे सरकारचे वक्तव्य आणि सल्ले असूनही, चीनमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. दररोज 30 हजारांहून अधिक लोक मदतीसाठी स्थानिक वैद्यकीय आपत्कालीन हेल्पलाइनवर कॉल करत आहेत. सिचुआन प्रांतात परिस्थिती वाईट आहे. येथे दररोज 700 ते 800 रुग्ण तापाची समस्या घेऊन येत आहेत.
चेंगडू शहरातील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सने सांगितले की, त्या दिवसाला 200 रुग्णांवर उपचार करत आहेत.
चेंगडू शहरातील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सने सांगितले की, त्या दिवसाला 200 रुग्णांवर उपचार करत आहेत.
  • आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना निर्बंध शिथिल केल्यामुळे संसर्गात मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आजारी पडत आहेत. काहींना संसर्गही होत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये औषधे संपली आहेत.
  • दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी चीनला कोरोनाव्हायरससंदर्भातील डेटा शेअर करण्यास सांगितले आहे. WHO ने एका निवेदनात म्हटले आहे - कोरोनाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याच्या उत्पत्तीशी संबंधित माहितीसाठी चीनकडून डेटा मागवण्यात आला आहे. चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.
बातम्या आणखी आहेत...