आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज संपूर्ण जग नवीन वर्षांचे स्वागत करत आहे. यात कोरोनाग्रस्त चीनमध्येही लोकांनी नववर्षाचे जंगी स्वागत केले आहे. कोरोना संसर्गाचा धोक्याला नाकारून लोक नववर्ष साजरे करण्यासाठी जागोजागी जमले होते. त्यामुळे बीजिंग आणि वुहानमध्ये मध्यरात्री लाखो लोकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळाली आहे. याचे अनेक व्हिडिओ व फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
जिनपिंग म्हणाले- एकत्रितपणे या संकटातून ताकदीने बाहेर पडू
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशवासियांना सांगितले - चीनमध्ये कोरोनाविरुद्धची लढाई नव्या टप्प्यात दाखल झाली आहे. मोठ्या आव्हानांसोबतच आपल्यासमोर आशेचा किरणही आहे. एकत्रितपणे, आपण या संकटातून अधिक ताकदीने बाहेर पडू.
चीनमधील नवीन वर्षाचे सेलिब्रेशन फोटोंमध्ये पाहा...
चीनमध्ये 13 जानेवारीला 37 लाख रुग्ण बाधित होते
एअरफिनिटी या लंडनस्थित ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनीने धक्कादायक दावा केला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये 13 जानेवारीला कोरोनाचा उच्चांक येईल. या दिवशी येथे 37 लाख कोरोनाबाधित केसेस येतील. 23 जानेवारीला कोरोनामुळे मृत्यूचा उच्चांक होईल. या दिवशी 25 हजार रुग्णांचा मृत्यू होणार आहे.
चीनमध्ये राख ठेवण्यासाठी पिशव्यांची गरज
चीन आणि चीनी कम्युनिस्ट पक्षावर देखरेख ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी एक फोटो पोस्ट केली होती. यामध्ये कोरोनाची भीषणता दिसून येते. चीनमध्ये राख ठेवण्यासाठी कलश मिळत नसल्याचा झेंगचा दावा आहे. लोकांना आपल्या प्रियजनांच्या अस्थी पिशवीतच ठेवाव्या लागतात
मोरोक्को: चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी
मोरोक्कोने 3 जानेवारीपासून चीनमधून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे. ते कोणत्याही देशाचे असू शकतात. रविवारी कॅनडाने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी आवश्यक केली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटन, स्पेन, अमेरिका, तैवान, जपान, भारत, इटली, दक्षिण कोरिया आणि पाकिस्ताननेही या लोकांसाठी चाचणी अनिवार्य केली आहे.
जपान : 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 16% अधिक मृत्यू
जपानमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यांत जपानमध्ये कोविडमुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 पट जास्त आहे. 30 डिसेंबर रोजी जपानी मीडिया मायनीची डेलीने प्रकाशीत केलेल्या अहवालानुसार, 1 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर या कालावधीत कोरोनामुळे 11,835 मृत्यू झाले आहेत. तर गेल्या वर्षी याच कालावधीत 744 मृत्यू झाले होते.
मैनीची डेली रिपोर्टनुसार, यावर्षी 31 ऑगस्ट ते 27 डिसेंबर या कालावधीत झालेल्या मृत्यूंपैकी 40.8% मृत्यू हे 80 वर्षांच्या वृद्धांचे होते. 90 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 34.7% लोकांचा मृत्यू झाला. 17% लोक होते ज्यांचे वय 70-79 वर्षे होते.
अमेरिका: XBB.1.5 प्रकाराचा देशात धोका निर्माण झाला
ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट XBB.1.5 अमेरिकेत वेगाने पसरत आहे. हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, देशातील 40% कोरोना प्रकरणे या प्रकारातील आहेत. गेल्या आठवड्यात हा आकडा 18% होता. त्यापूर्वी, यूएस मध्ये XBB.1.5 ची प्रकरणे 11% होती. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 10 कोटी 25 लाख कोरोना रुग्ण आणि 11 लाख 17 हजार मृत्यू झाले आहेत.
जगात 66 कोटी 47 लाखांहून अधिक प्रकरणे
कोरोना वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत 66 कोटी 47 लाख 30 हजार 682 रुग्ण आढळले आहेत. 11 जानेवारी 2020 रोजी चीनमधील वुहान येथे एका 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कोविडमुळे जगातील हा पहिला मृत्यू होता. यानंतर मृत्यूची प्रक्रिया वाढू लागली. आतापर्यंत 66 लाख 96 हजार 763 मृत्यू झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.