आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमधील झीरो कोविड धोरणाविरोधात निदर्शने केली जात आहेत. आता या निदर्शनात आणखी एका ाकार्टून देखील महत्त्वाची भूमीका घेतली आहे. 'विनी द पूह बेअर' या कार्टून पात्राने आता चीनच्या कोविड धोरणाविरोधातीव निदर्शनात एंट्री केली आहे. त्यामुळे शी जिनपिंग आणि पूह बेअर कार्टून यांच्यातील वाद जुनाच असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
शी जिनपिंग यांच्या विरोधाचे प्रतिक बनले कार्टून
जपानमधील डिस्ने स्टोअर्स टी-शर्ट आणि इतर मालांची मोठ्या प्रमाणात विक्री करित आहेत. ज्यावर मुलांचे आवडते कार्टून पूह बेअर हातात पांढरा कपडा धरून उभा आहे. अर्थात या कार्टूनकडे चीनमधील आंदोलकांना पाठिंबा म्हणून पाहीले जात आहे. कारण, कोविड निर्बंधाविरोधात चीनमधील लोक हातात श्वेतपत्रिका घेऊन निषेध करत होते. तेव्हापासून ते शी जिनपिंग यांच्या विरोधाचे प्रतिक बनले आहेत.
बॅग, टी-शर्ट, जॅकेटचा समावेश
पूह अस्वलाचा पांढरा कागद हातात धरलेल्या फोटोसह टी-शर्ट, बॅग, जॅकेट आणि मग यासह विविध प्रकारच्या मालाची ऑनलाइन विक्री केली जात आहे. हे सर्व सामान डिस्नेच्या MADE प्रोग्राम अंतर्गत बनवले जात आहे. यामध्ये लोकांना डिस्नेच्या कोणत्याही वस्तूमध्ये त्यांच्या इच्छेनुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, आतापर्यंत डिस्नेने या संपूर्ण प्रकरणात कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.
शी जिनपिंग आणि पूह बेअर यांच्यातील वाद जुनाच
साधारणतः 2013 ची गोष्ट आहे की, त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. या दोघांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात शी जिनपिंग पूह बेअरच्या भूमिकेत आणि ओबामा पूहचा मित्र टायगरच्या भूमिकेत दाखविण्यात आले होते. तेव्हापासून लोकांनी शी जिनपिंग यांची डिस्नेच्या कार्टून पात्र विनी द पूह बेअरशी तुलना करण्यास सुरुवात केली.
चीनमध्ये अशा प्रकारच्या विनोदावर बंदी
त्यानंतर 2014 मध्येही असेच काहीसे घडले होते. यावेळी शी जिनपिंग यांच्या जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या भेटीचे चित्र समोर आले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून चीनने 2017 मध्ये अशा मजेदार पोस्टवर बंदी घातली. शी जिनपिंगला पूह बेअरशी जोडणारी सामग्री देखील बेकायदेशीर घोषित करण्यात आली. एवढेच नाही तर 2018 मध्ये या कार्टूनवर बनलेल्या चित्रपटावर चीनमध्ये बंदी घालण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.