आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेजारील चीनमध्ये कोरोनाचे तांडव सुरू आहे. रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत आहेत. स्मशानभूमीत मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा नाही. मात्र या स्थितीतही शी जिनपिंग चीनमध्ये लॉकडाऊन लावण्यास तयार नाही. देश अनलॉक करण्यासाठी 3 वर्षांपूर्वीचे झिरो कोविड धोरणही रद्द करण्यात आले आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांना हे समजावले जात आहे की, ओमिक्रॉन व्हेरिएंट घातक नाही.
ब्ल्यूमबर्गच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये लोकांना सांगितले जात आहे की, हे हंगामी फ्लू सारखेच आहे. देशातील सर्वात प्रभावी साथरोग तज्ज्ञ झोंग नानशान यांनी तर असेही म्हटले आहे की, ओमिक्रॉन विषाणू सामान्य सर्दीपेक्षा जास्त काहीच नाही.
काहीही होवो अर्थव्यवस्था नीट राहिली पाहिजे
चीनमध्ये सरकारी अधिकाऱ्यांचे मत असे आहे की, कोरोना पसरला तरी अर्थव्यवस्थेची गती कायम राहिली पाहिजे. उत्पादन आणि कारखान्यांतील काम थांबायला नको. या धोरणामुळेच शहरांत कामगारांना सांगितले जात आहे की, ते भलेही संक्रमित झाले तरी चालेल, पण त्यांनी कामावर परतले पाहिजे.
अधिकाऱ्यांनी पश्चिमेकडील महानगर चोंगकिंगमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना म्हटले की जर ते कमी लक्षणे असलेल्या कोरोनाने संक्रमित आहेत, तर त्यांनी कामावर परतले पाहिजे. तर पूर्व किनाऱ्यावरील उत्पादन केंद्र झेजियांगमधील अधिकारी म्हणाले की, संक्रमित झाल्यावरही लोकांनी काम केले पाहिजे.
आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न, रात्रंदिवस अंत्यसंस्कार सुरू
चीन कोरोनाची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. जगापासून मृत्यूची आकडेवारी लपवण्यासाठी चीनने नियमच बदलले आहेत. आता नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. यानुसार केवळ श्वसनाशी निगडित आजारांची गणनाच कोरोनात केली जाईल. बीजिंगमधील सर्वात मोठ्या स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार होत आहेत. सामूहिक अंत्यसंस्कार सुरु झाले आहेत आणि याचे फोटोही येत आहेत. तथापि, कोरोनामुळे मृत्यूचे दैनंदिन आकडे 5-10 इतकेच सांगितले जात आहेत. तज्ज्ञांचा दावा आहे की, वास्तविक आकडेवारी खूप जास्त आहे.
चीनच्या भ्रामक आकडेवारीने चिंताः WHO
जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडून कोरोनाची योग्य आकडेवारी दिली जात नसल्यावर चिंता व्यक्त केली आहे. संघटनेने बुधवारी म्हटले की, चीनमधील आकेडवारी विश्वासार्ह नाही. रुग्णालयांतील जे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत, ते भयावह आहेत. यामुळे जगात धोका वाढू शकतो.
या बातम्याही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.