आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • China Coronavirus Vaccine Latest News Updates; Pakistan Does Not Trust China COVID Vaccine | Vaccine Trail In Saudi Arabia, Turkey, Indonesia, Brazil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनवरील विश्वास उडाला:कोरोना व्हॅक्सीनचे 6 फॉर्मूले तयार, पण कुणीही खरेदीदार नाही; पाकिस्तानलाही त्यांच्या व्हॅक्सीनवर विश्वास नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनी लस कंपन्यांची 16 देशांमध्ये तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू आहे.

ब्लूमबर्ग आणि दैनिक भास्करच्या करारा अंतर्गत

कोरोनाव्हायरस संपवण्यासाठी बर्‍याच देशांनी बड्या कंपन्यांच्या लस बुक केल्या आहेत, परंतु चीनच्या लस विश्वासाच्या चाचणीत अपयशी ठरत आहेत. जगाला कोरोना वाटणाऱ्या चीनने आता लसांचा साठा तयार केला आहे. त्यांच्याकडे लस तयार करण्याचे सहा फॉर्म्युले आहेत, परंतु कोणताही देश त्याच्या लसीवर विश्वास ठेवत नाहीय.

चीनच्या व्हॅक्सीनची सौदी अरेबिया, तुर्की, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान यासारख्या देशांमध्ये चाचपणी सुरू आहे, परंतु सार्वजनिक सर्वेक्षण आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात असे दिसून आले आहे की चीन या देशातील कोट्यवधी लोकांना आश्वासन देण्यात अपयशी ठरला आहे की लस सुरक्षित आहे.

कराची येथील राइड-अॅपचे बाइक चालक फरमान अली शाह म्हणाले की, 'मी ही लस घेणार नाही, मला त्यांच्यावर विश्वास नाही.' चीनचा पक्का मित्र पाकिस्तानच्या लोकांचे हे मत अशा वेळी आले आहे जेव्हा चीनने रोड ते पॉवर स्टेशनपर्यंत 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. इथली परिस्थिती अशी आहे की मोठ्या सरकारी अधिका-यांना दोन चाचण्यांमध्ये भाग घ्यावा लागला आहे.

ब्राझीलमधील लोकांना चीनवर विश्वास नाही
त्याच वेळी, ब्राझीलमधील एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 50% लोकांना चीनी लस नको आहे. 36% लोक म्हणाले की ते रशियन लस घेणार नाहीत. ज्या डझनभर गरीब देशांना पश्चिमी देशातील व्हॅक्सीन मिळू शकत नाही. अशा देशांना लस उपलब्ध करुन चीनचा मोठा राजकीय फायदा मिळू शकला असता. मात्र हा अविश्वास आणि गरीब देशांचे चीनवर अवलंबून असणे याने जगासमोर मोठे राजकीय संकट उभे केले आहे.

यामागील प्रमुख कारण म्हणजे सिनोवॅकच्या अंतिम टप्प्यातील चाचणीच्या निकालांची थोडीच माहिती सार्वजनिक केली गेली आहे. तर अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांनी पूर्ण आकडेवारी दिली आहे. या अनिश्चिततेमुळे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत प्रभाव वाढवण्याच्या चीनच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.

चीनवर विश्वास नसल्याची पुरेशी कारणे
लोक चीनच्या लसीवरही विश्वास ठेवत नाहीत कारण त्यांनी कित्येक देशांना निकृष्ट मास्क, टेस्ट किट आणि पीपीई सूट निर्यात केले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्लूमबर्गला सांगितले की, दोन टप्प्यांच्या चाचण्यांमध्ये चीनी लस सुरक्षित असल्याचे आढळले. अद्याप विपरीत परिणाम दर्शवला नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सोमवारी सोशल मीडियावर म्हटले आहे की ज्या सरकारांनी लस डोस बुक केला नाही त्यांच्याकडे चीनच्या लसचा एकमेव पर्याय असेल. कारण पुढच्या वर्षी, जवळजवळ 1200 कोटी डोसपैकी तीन चतुर्थांश श्रीमंत देशांनी बुक केले आहेत.

चीनी लस कंपन्यांची 16 देशांमध्ये तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू आहे. आतापर्यंत युएई आणि चीनने स्वत: लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो यांनी चिनी लसीवर हल्ला केला आहे. ते बर्‍याच वेळा बोलले आहेत की ते चिनी लस खरेदी करणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...