आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावरून भडकलेल्या चीनने शुक्रवारी लष्करी कवायतीची कक्षा वाढवली. त्याने आपली लढाऊ जहाजे आणि विमाने तैवानच्या आणखी जवळ आणून तैनात केली. चीनने केवळ तैवानच्या सीमा क्षेत्रात क्षेपणास्त्रे डागली नाहीत तर त्याने त्यांच्या हवाई हद्दीतही घुसखोरी केली.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चीनची १३ लढाऊ जहाजे आणि ६८ विमानांनी त्यांचे सागरी क्षेत्र ओलांडले आहे. दुसरीकडे, चीनने अमेरिकेविरुद्ध मुत्सद्देगिरीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत पेलोसी यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. चीनने अमेरिकी संरक्षण अधिकाऱ्यांशी फोनवरील चर्चा, लष्करी कमांडर्सची बैठकही रद्द केली आहे. चीनच्या संरक्षण आणि विदेश मंत्रालयाने सांगितले की, या आठवड्यात लष्करी सागरी सुरक्षेवरील चर्चा, लष्करी कमांडर्स आणि संरक्षण विभागाच्या प्रमुखांतील चर्चा रद्द केली आहे.
अमेरिका म्हणाली - तैवानला आम्ही एकटे सोडू शकत नाही चीनचे 8 पलटवार : अमेरिकेशी नाते संपुष्टात 1. चीन-यूएस थिएटर कमांडर्सची चर्चा रद्द. 2. चीन-अमेरिकी संरक्षण धोरण समन्वय चर्चा रद्द. 3. चीन-यूएस मिलिटरी मेरीटाइम काॅन्सुलेट अॅग्रीमेंट बैठक रद्द. 4. अवैध स्थलांतरितांना देशात परत आणण्यावर चीन-अमेरिकी सहकार्य निलंबित. 5. गुन्हेगारी प्रकरणांत कायदेशीर मदतीवर चीन-अमेरिका सहकार्य निलंबित. 6. आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांविरुद्ध चीन-अमेरिका सहकार्य निलंबित. 7. चीन-अमेरिकेचे अमली पदार्थांिवरुद्ध सहकार्य निलंबित. 8. वातावरण बदलावर दोन्ही देशांची चर्चा निलंबित.
अमेरिका म्हणाली - चीनने अकारण प्रतिक्रिया देऊ नये : जपानमध्ये दाखल पेलोसी यांनी सांगितले की, अमेरिका तैवानला एकटे सोडू शकत नाही. त्यास एकटे पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. अमेरिकी सुरक्षा परिषदेचे व्यूहात्मक दळणवळण समन्वयक जॉन किर्बी यांनी चीनने अनावश्यक प्रतिक्रिया देणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. अमेरिकी संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी नुकतेच निगराणीसाठी अमेरिकी लढाऊ जहाज यूएसएसएस रोनाल्ड रिगनला तैवानजवळ समुद्रात तैनात राहण्याचे निर्देश दिले आहेत. युद्धाच्या शक्यतेमुळे बाजार धास्तावला, तैवानचा बाजार २.२७% वधारला : चीन-तैवान यांच्यातील वाढत्या तणावात जगभरातील शेअर बाजार भयभीत झाले. मात्र, तैवानच्या शेअर बाजाराने शुक्रवारी २.२७% उसळी घेतली.
तैवानच्या बाजूने ११ क्षेपणास्त्रे डागली पेलोसींच्या तैवान दौऱ्यानंतर चीनने गुरुवारी तैवानजवळ लष्करी कवायत सुरू केली. चीनने तैवानच्या बाजूने ११ क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी ५ क्षेपणास्त्रे जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कोसळली. या कृतीचा जपानने विरोध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.