आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन:कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची भीती, वुहानमध्ये सर्व 1.10 कोटी रहिवाशांची करणार कोरोना चाचणी

बीजिंग/ सेऊलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • द. कोरिया : नाइट क्लबमध्ये गेलेले 108 जण बाधित, 2000 चा शोध

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू होऊ शकतो. एकाच दिवसात ६ नवे रुग्ण आढळल्यानंतर सरकारी माध्यमांनी भीती व्यक्त केली आहे. यात म्हटले आहे की, जिलिन आणि हुबेई राज्यात अधिकारी संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचे कठोर पालन करण्यासाठी तयारी करत आहेत. जिलिन राज्यातील शुलान शहरात अचानक १५ रुग्ण आढळले. त्यानंतर येथे मार्शल लॉ लागू केला. शुलान रशिया सीमेवरील शहर आहे. त्याला हाय रिस्क झोन घोषित करण्यात आले आहे. येथे एका ४५ वर्षांच्या महिलेमुळे संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनीही म्हटले आहे की, आता वुहानच्या सर्व नागरिकांची कोरोना चाचणी केली जाईल. वुहानची लोकसंख्या १.१० कोटी आहे. दरम्यान, चीनमध्ये १६ नवे रुग्ण आढळले आहेत. यातील १५ मध्ये लक्षणे दिसली नाहीत.

द. कोरिया : नाइट क्लबमध्ये गेलेले १०८ जण बाधित, २००० चा शोध
दक्षिण कोरियात नाइट क्लब, बार, पबमधून संसर्गाचा धोका वाढत आहे. अधिकाऱ्यांनी राजधानी सिओलमध्ये ७००० अशा लोकांची तपासणी केली जे नाइट क्लबमध्ये गेले होते. यातील १०८ जण बाधित आढळले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यातील बहुतांशी लोक तृतीयपंथी असू शकतील. ते समोर यायला घाबरत आहेत. गेल्या आठवड्यात नाइट क्लबमधून आलेला २९ वर्षांचा एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला होता. त्याच्या संपर्काची तपासणी करण्यात आली. तो एकाच दिवसात तीन नाइट क्लबमध्ये गेला होता. या व्यक्तीच्या कोरोना साखळीशी संबंधित २००० लोकांचा शोध घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...