आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळी तरुणांच्या इंट्रेस्टमुळे चीन अस्वस्थ:भारतीय सैन्यामध्ये का सामील होतात नेपाळचे गोरखा? चीन घेतोय शोध; नेपाळच्या एनजीओला दिला फंड

काठमांडूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोरखा रेजिमेंटने दिले तीन लष्करप्रमुख

चीन आपल्या कारवाया थांबवायचे नाव घेताना दिसत नाही. सूत्रांनुसार काठमांडू येथील चिनी वकिलातीने नेपाळचे गोरखा भारतीय सैन्यात का सामील होतात याचा शोध घ्यायला चीन स्टडी सेंटर या एनजीओला सांगितले आहे. यासाठी एनजीओला सुमारे १३ लाख रुपये देण्यात आले आहेत. भारतीय लष्करात नेपाळचे गोरखा भरती होत असतात आणि गोरखा रेजिमेंट भारतीय लष्करातील एक लढाऊ रेजिमेंट म्हणून ओळखली जाते.

नेपाळचे ते भागही शोधण्यासाठी एनजीओला सांगण्यात आले आहे, जेथून मोठ्या प्रमाणात गोरखा भारतीय सैन्यात भरती होतात. गोरखांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचीही माहिती घेण्यास सांगितले आहे. भारतीय लष्करात सध्या सात गोरखा रेजिमंेट आहेत. यात सुमारे २८ हजार नेपाळी नागरिक आहेत. या सात रेजिमेंटमध्ये ३९ बटालियन आहेत. आधी ११ गोरखा रेजिमेंट होत्या. यातील चार ब्रिटिश लष्कराचा भाग झाल्या. पहिली, तिसरी, चाैथी, पाचवी, आठवी, नववी आणि अकरावी गोरखा रेजिमंेट भारतीय लष्करात आली, तर दुसरी, सहावी, सातवी आणि दहावी रेजिमेंट ब्रिटिश लष्कराचा भाग झाली. गोरखा समाजात चार जमाती आहेत. त्यांची नावे खास, गुरुंग, लिंबूस आणि राइस आहेत.

गोरखा रेजिमेंटने दिले तीन लष्करप्रमुख

या रेजिमेंटने भारतीय सैन्याला तीन लष्करप्रमुख दिले आहेत. जनरल सॅम माणेकशाॅ, जनरल दलबीर सिंह आणि जनरल बिपिन रावत. जनरल सॅम माणेकशॉ भारताचे पहिले फील्ड मार्शल होते. गोरखा रेजिमेंटच्या शौर्याबाबत माणेकशॉ सांगायचे, मला मरायची भीती नाही, असे कुणी म्हणत असेल तर तो खोटे बोलत असेल किंवा तो गोरखा असेल.

बातम्या आणखी आहेत...