आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेना परिणाम:चीनच्या मृतांच्या संख्येत 50 % वाढ, वुहानमध्ये नवीन 1,290 जणांची मृतांची भर

बिजिंग/वुहानएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अनेक प्रकरणांत मृत्यूचे कारण जाणून घेण्यात झाली चूक

काेराना व्हायरसची प्रकरणे लपवण्यात आल्याचा आराेप करण्यात येत असतानाच चीनमधील वुहान शहरामध्ये मृतांची नवीन आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत १,२९० नवीन मृतांचा समावेश झाला असून मृतांच्या संख्येत आता जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरातील  मृतांचा आकडा ३,८६९ झाला असून याआधी ताे २,५७९ हाेता. संसर्गग्रस्तांची संख्याही ३२५ ने वाढून आता ती ५०,३३३ वर गेली असल्याचे वुहान नगरपालिका मुख्यालयाने म्हटले आहे. आता चीनमधील पीडितांची एकूण संख्या ८२,६९२ झाली असून मरण पावलेल्यांची संख्या ४,६३२ झाली आहे. चीनच्या हुबेई भागाची राजधानी वुहानपासून काेराेना संसर्ग सुरू झाला होता. वुहानच्या अनेक प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारण समजावून घेण्यात चूक झाली होती. 

काेराेना परिणाम : १९७६ नंतरची अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठी घसरण

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये ६.८ टक्क्यांनी घट झाल्याचे चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने शुक्रवारी स्पष्ट केले. १९७६मधील सांस्कृतिक क्रांतीनंतरची जीडीपीतील सर्वात माेठी घसरण आहे.

बातम्या आणखी आहेत...