आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरक्षेच्या कारणास्तव भारतात 54 मोबाईल चीनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या या निर्णयावर चिंता व्यक्त करताना चीनने म्हटले आहे की, भारताच्या या निर्णयामुळे अनेक चीनी कंपन्यांचे त्यांचे हक्क आणि हितसंबंधांना धक्का पोहोचला आहे. यासोबतच भारत चिनी कंपन्यांसह सर्व परदेशी गुंतवणूकदारांसोबत पारदर्शक, निष्पक्ष आणि भेदभाव न करता काम करेल, अशी अपेक्षाही चीनने व्यक्त केली आहे.
चीनचे प्रवक्ते म्हणाले- भारताच्या आर्थिक विकासात मोठे योगदान दिले
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग यांनी भारताच्या या निर्णयावर म्हटले की, 'भारतीय अधिकाऱ्यांनी अलीकडेच चिनी कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, ज्यामुळे चिनी कंपन्यांच्या कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे. चिनी कंपन्यांसह परदेशी गुंतवणूकदारही भारतातील गुंतवणुकीच्या वातावरणाबद्दल खूप चिंतेत असल्याचे दिसून आले आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण केल्या आहेत आणि भारताच्या आर्थिक विकासात योगदान दिले आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चीन आणि भारत हे केवळ शेजारी देश नाहीत तर महत्त्वाचे आर्थिक आणि व्यापारी भागीदार आहेत. 2021 मध्ये दोन्ही देशांमधला व्यापार 125.7 अब्ज डॉलरच्या जवळपास पोहोचला.
सरकारने 54 चीनी अॅप्सवर बंदी घातली
गेल्या मंगळवारी, भारत सरकारने चीनवर डिजिटल स्ट्राइक करत देशातील 54 स्मार्टफोन अॅप्सवर बंदी घातली होती. हे सर्व अॅप्स भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करत होते. बंदी घातलेल्या अॅप्समध्ये लोकप्रिय गेम गॅरेना फ्री फायर आणि अॅपलॉक अॅपचाही समावेश आहे. जून 2020 च्या सुरुवातीला, भारताने देशाच्या सुरक्षेला लक्षात घेऊन, टिकटॉक, वीचॅट आणि हॅलो सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह 59 चीनी मोबाइल अॅप्सवर बंदी घातली होती.
300 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे
भारत सरकारने यापूर्वी 29 जून 2020 रोजी चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. 29 जून 2020 रोजी पहिला डिजिटल स्ट्राइक करताना 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर 27 जुलै 2020 रोजी 47 अॅप्स, 2 डिसेंबर 2020 रोजी 118 आणि नोव्हेंबर 2020 रोजी 43 अॅप्सवर बंदी घालण्यात आली. आता 14 फेब्रुवारी 2022 रोजी 54 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सर्व अॅप्सवर बंदी घातली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.