आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये ३२ हजार काेटी रुपये खर्चून डासू धरण हाेत आहे. त्यावरूनही चीनने इशारा दिला. मजूर नमाजसाठी जास्त वेळ घालवतात, असे साइट इंजिनिअरचे म्हणणे हाेते. त्यावरून अभियंत्यांवरच ईशनिंदेच्या आराेपावरून गुन्हा दाखल झाला. खैबरमध्ये २०२१ मध्ये बस हल्ल्यात चीनच्या ९ अभियंत्यांची हत्या झाली हाेती.
अमेरिकेने पाक संबंध थंड बस्त्यात टाकले : चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या पाकिस्तानसाठी अमेरिकेची नाराजी माेठा झटका आहे. २०२१ मध्ये अफगाण बाहेर पडल्यावर अमेरिकेने पाकसाेबतच्या संबंधाला जणू थंड बस्त्यात टाकले. पंतप्रधान शाहबाज शरीफ व बिलावल यांनी अमेरिकेचा दाैरा केला. परंतु बायडेन प्रशासनाचा माेठा पदाधिकारी दाेन वर्षांत पाक भेटीवर गेला नाही. विल्सन सेंटरचे फेलाे बकीर सज्जाद म्हणाले, पाकिस्तान चीनची साथ साेडणार नाही, असे अमेरिकेला वाटते.
आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला महागडे कर्ज दिल्यानंतर चीनने आता आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली. चीनकडून दाेन लाख २२ हजार काेटी रुपये कर्जाच्या बदल्यात सुमारे पाच वर्षे २ लाख ५ हजार काेटी रुपये एवढा वार्षिक हप्ता देण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. पाकिस्तान साडेचार पटीच्या दराने कर्जफेड करत आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गाँग यांनी पाकिस्तान दाैऱ्यात लष्करप्रमुख आसिम मुनीर व परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्ताे यांना राजकीय परिस्थितीत लवकर सुधारणा करावी, असा इशारा देऊन टाकला. गाँग म्हणाले, पाकिस्तानात राजकीय स्थैर्य आणि आर्थिक विकासाचा वेग दिसला नाही तर चीन येथील गुंतवणुकीबाबत फेरविचार करू शकताे. गाँग यांचा पवित्रा पाहून घाबरलेल्या पाक सरकारने जनतेमध्ये नामुष्की हाेऊ नये म्हणून बिलावल आणि गाँग यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले नाही. पाकचे अवलंबित्व एवढे वाढले की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बेलआऊट पॅकेजच्या ५३ हजार काेटी रुपयांपैकी २४ हजार काेटींच्या गॅरंटी मनीमध्येही चीनचा माेठा भाग आहे.
निवडणुकीपूर्वी चीनचा इशारा पाकसाठी अलार्म
इस्लामाबाद येथील सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी रिसर्चचे संचालक इम्तियाज गुल म्हणाले, ऑक्क्टाेटोबरमध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय सुधारणेचा चीनचा इशारा हा पाकिस्तानसाठी माेठा अलार्म म्हणावा लागेल. पाकिस्तानला काही उपाय करावे लागतील. राजकीय विश्लेषक मारियाना बाबर म्हणाल्या, एप्रिल महिन्यात चीन दाैऱ्यावर गेलेल्या लष्करप्रमुख मुनीर यांना चीनने सल्ला दिला होता.
३२ हजार काेटी रुपयांच्या धरणावरून इशारा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.