आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China Increase Defense Budget; China Spend 18 Lakh Crore Rupees On Defense Budget | Government Of China | Xi Jinping

चीनमध्ये शी जिनपिंग अधिक शक्तिशाली:राष्ट्रपतींचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढणार; पंतप्रधानांसह अनेक मंत्रीही हटणार

बीजिंग24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन संसदेच्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सभागृहात आले. - Divya Marathi
चीन संसदेच्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सभागृहात आले.

चीनची संसद नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक बैठकीला रविवारी सुरूवात झाली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उद्घाटन सत्रात हजेरी लावली. चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये यंदा 7.2 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी तेथील कम्युनिस्ट सरकारने बाह्य आव्हानांचा हवाला दिला आहे.

2023 मध्ये चीन आपल्या संरक्षण बजेटवर 18 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. जे भारताच्या संरक्षण बजेटपेक्षा 3 पट जास्त आहे. आठवडाभर ही बैठक सुरू राहणार असून त्यात चीन सरकारमधील मंत्र्यांच्या बदल्या होणार तर नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाणार आहे. वृत्तानुसार या बैठकीत शी जिनपिंग यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवण्यात येणार आहे.

चीन संसदेच्या वार्षिक अधिवेशनात अध्यक्ष शी जिनपिंग (मध्यभागी) उपस्थित.
चीन संसदेच्या वार्षिक अधिवेशनात अध्यक्ष शी जिनपिंग (मध्यभागी) उपस्थित.

चीनने आर्थिक विकासाचा दर 5% ठेवला
बैठकीत 2023 साठी चीनच्या आर्थिक विकासाचे लक्ष्य 5% ठेवण्यात आले आहे. जी गेल्या वर्षीच्या चीनच्या आर्थिक वाढीपेक्षा 2% जास्त आहे. पंतप्रधान ली केकियांग यांनी वार्षिक कार्य अहवाल वाचताना सांगितले की, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य असेल. याशिवाय 1 कोटी 20 लाख लोकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

फोटोमध्ये पाहा...चीन संसदेची वार्षिक बैठक

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांशी काही संवाद साधत आहेत.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांशी काही संवाद साधत आहेत.
चीनच्या संसदेच्या वार्षिक बैठकीत शी जिनपिंग यांचे त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी स्वागत केले.
चीनच्या संसदेच्या वार्षिक बैठकीत शी जिनपिंग यांचे त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी स्वागत केले.
चीनच्या संसदेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचे हे चित्र आहे.
चीनच्या संसदेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचे हे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...