आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणबुडी ताफ्यात वाढ:चीनच्या तुलनेत ताकद निम्म्यापेक्षा कमी

अॅडमिरल अरुण प्रकाश, माजी नौदलप्रमुख9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आपल्या पाणबुडीचा ताफा पायाभूत स्तरावर आला आहे या दृष्टीकोनातून नौदलाच्या स्कॉर्पीन क्लासची ५ वी पाणबुडी मिळणे महत्त्वाचे आहे. नौदलाकडे जेवढे विशाल जलक्षेत्र निगराणीसाठी आहे,त्या हिशेबाने त्याच्याकडे अंडर वॉटर प्लॅटफाॅर्म्सची संख्या खूप मर्यादीत आहे. स्कार्पीन प्रोजेक्ट २००५ मध्ये सुरू झाला. हा १९ वर्षांनंतर पूर्ण होत आहे.

ही पाणबुडी २२१ फूट लांब, ४० फूट उंच, १९ फूट खोल आणि १ हजार ५६५ टन वजनी आहे. ही शत्रूच्या रडाला सहज चुकवू शकते. टारपीडो हल्ल्यासोबत ट्यूबद्वारे जहाजविरोधी क्षेपणास्त्र लाँच करू शकते. आवाज कमी करते. शत्रूच्या नजरेपासून वाचू शकते. (दै. भास्करला सांगितल्यानुसार)

भारताची तयारी सुरू {रशिया, जर्मनीकडून घेतल्या ११ जुन्या पाणबुड्या. यात ७ किलो क्लास व ४ टाइप २०९ आहेत. {फ्रान्सच्या करारांतर्गत तयार होणाऱ्या स्कार्पीन पाणबुडीपैकी ५ नौदलाला मिळाल्या आहेत. सहावी यंदा मिळेल. आण्विक आयएनएस अरिहंत, अणु पाणबुडी आयएनएस अरिघटची चाचणी सुरू. {भारताची ताकद ३० पाणबुड्या असणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...