आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन वर्षे बंद राहिलेल्या कैलास - मानसरोवर यात्रेसाठी चीनने व्हिसा जारी करायला सुरुवात केली आहे. परंतु त्यासाठीचे नियम अत्यंत कठोर केले आहेत. यासह यात्रेसाठीचे विविध शुल्क जवळपास दुप्पट केले आहेत. इतकेच नव्हे, भाविकाने आपल्या मदतीसाठी नेपाळहून एखादा कामगार किंवा मदतनीस सोबत घेतला असेल तर ३०० डॉलर म्हणजे २४ हजार रुपये जादा द्यावे लागतील. या शुल्काला ‘ग्रास डॅमेजिंग फी’ असे म्हटले आहे. यात्रेदरम्यान कैलास पर्वताच्या परिसरातील गवताचे नुकसान होते, असा चीनचा कयास असून त्याची भरपाई यात्रेकरूंकडूनच केली जाईल.
चीनने काही असे नियम तयार केले आहेत ज्यामुळे समस्या वाढल्या आहेत. उदा. आता प्रत्येक यात्रेकरूला काठमांडू बेसवरच आपले युनिक आयडेंटिफेशन करावे लागेल. यासाठी बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांची स्कॅनिंग होईल. नेपाळी टूर ऑपरेटरचे म्हणणे आहे की, हे गुंतागुंतीचे नियम परदेशी, विशेषत: भारतीय यात्रेकरूंची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी तयार केले आहेत. ‘द काठमांडू पोस्ट’नुसार, नेपाळच्या तीन प्रमुख टूर ऑपरेटरनी हे नवे नियम मागे घेण्याची मागणी चिनी राजदूत चेन सांग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रत्यक्षात, कैलास-मानसरोवर यात्रा नेपाळच्या टूर ऑपरेटरसाठी मोठा व्यवसाय आहे. नवे नियम आणि वाढीव शुल्कामुळे टूर ऑपरेटर आता रोड ट्रिपसाठी प्रति यात्रेकरू किमान १.८५ लाख रुपये घेऊ लागले आहेत. २०१९ मध्ये रोड ट्रिपचे पॅकेज ९० हजार रुपयांचे होते. यात्रेसाठी नोंदणी एक मेपासून सुरू झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या यात्रेबाबत टूर ऑपरेटरचे म्हणणे आहे, की नव्या नियमांमुळे यंदा लोकांचा ओढा कमी दिसत आहे. कैलास यात्रा 3 वेगवेगळ्या राज्यमार्गांनी होते. पहिला- लिपूलेख दर्रा (उत्तराखंड), दुसरा- नाथू दर्रा (सिक्कीम) आणि तिसरा- काठमांडू. या तिन्ही मार्गांवर किमान ४ आणि कमाल २१ दिवस लागतात.
यात्रेकरूंना व्हिसा घेण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहावे लागेल. ऑनलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. म्हणजे आधी चिनी दूतावासाला खेटे मारावे लागतील. त्यानंतर काठमांडू वा अन्य बेस कॅम्पवर बायोमेट्रिक ओळख प्रक्रिया पार पाडावी लागेल. व्हिसा मिळवण्यासाठी आता किमान ५ जणांचा समूह आवश्यक आहे. यापैकी चौघांना व्हिसासाठी प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक आहे. तिबेटमध्ये प्रवेश करणाऱ्या नेपाळी कामगारांकडून ग्रास डॅमेजिंग फी’च्या म्हणून ३०० डॉलर आकारले जातील. हा खर्च यात्रेकरूलाच करावा लागेल. कारण यात्रेकरूच गाइड, हेल्पर, भारवाहक अथवा स्वयंपाकी म्हणून कामगार घेऊन तिबेटमध्ये प्रवेश करतात. एखाद्या कामगाराला सोबत ठेवण्यासाठी १५ दिवसांचे प्रवास शुल्क म्हणून १३००० रुपये घेतले जातील. आधी हे शुल्क फक्त ४२०० रुपये होते.
नवे नियम, ज्यामुळे यात्रा झाली कठीण
यात्रेचे संचालन करणाऱ्या नेपाळी फर्मंना ६०,००० डॉलर चिनी सरकारकडे जमा करावे लागतील. यात अडचण अशी आहे, की नेपाळी ट्रॅव्हल एजन्सींना विदेशी बँकांत पैसे जमा करण्याची परवानगी नाही. त्यामुळे ही रक्कम कशी ट्रान्सफर होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.