आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China India Border Tension | Chinese Newspaper Global Times; India Army And PLA Disengagement At Pangong Lake

लडाखमधील तणाव संपल्याचा दावा:चीनने म्हटले - 'LAC वर चीन-भारताचे सैनिक मागे हटण्यास सुरुवात, 9 व्या फेरीतील बैठकीत झाली सहमती'

बीजिंग2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 जानेवारीला झाली होती हिंसक चकमक

चीन सरकारने बुधवारी दावा केला की लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) वर 9 महिन्यांपासून चाललेला संघर्ष संपला आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंनी एकाचवेळी सैन्यांनी माघार घेण्यास बुधवारी सुरुवात झाली. मात्र या विषयावरुन भारताकडून कोणतेही विधान आलेले नाही. याआधी चिनी माध्यमांनी असा दावाही केला होता की पँगॉन्ग लेकच्या दक्षिण आणि उत्तर परिसरातून भारत-चीनच्या सैन्याने डिसइंगेजमेंटची प्रोसेस सुरू केली आहे.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता वू कियान म्हणाले की, चीन आणि भारत यांच्यातील मिलिट्री कमांडर स्तरावरील चर्चेच्या 9 व्या फेरीमध्ये डिसइंगेजमेंटवर मान्यता देण्यात आली. त्याअंतर्गत दोन्ही देशांच्या सैन्याने पँगॉन्ग हुनान आणि नॉर्थ कोस्टवरुन मागे हटण्यास सुरुवात केली आहे. पूर्व लडाखच्या मोल्दो येथे 9 व्या फेरीतील चर्चा 15 तास चालली. यात भारताने म्हटले होते की विवादित भागातून सैन्य काढून टाकण्याची प्रक्रिया आणि तणाव कमी करण्याची प्रक्रिया पुढे नेण्याची जबाबदारी आता चीनवर आहे.

एप्रीलपासून आमने-सामने आहेत सैन्य
चीन आणइ भारताचे सैन्य पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी एप्रील-मेपासून आमने-सामने आहेत. जून 2020 मध्ये गलवानमद्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. चीनचेही 40 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. मात्र त्यांनी ते मान्य केले नव्हते.

दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्री या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी बोलले आहेत. दोन्ही देशांनी लडाखच्या काही भागांमधून सैन हटवण्यावर सहमती दर्शवली आहे. तरीही सीमा वादाविषयी कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

20 जानेवारीला झाली होती हिंसक चकमक
20 जानेवारीला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. भारतीय सैन्याने सांगितले होते की, सिक्किमच्या नाकु लामध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले होते. दोन्ही सैन्याच्या कमांडर्सने ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार वाद मिटवला.

सूत्रांनुसार चीनने LAC घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय जवानांनी रोखले तर चीनच्या सैनिकांनी गोंधळ सुरू केला. भारतीय सैनिकांनी याचे उत्तर देत चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. या चकमकीमध्ये चीनचे 20 सैनिक जखमी झाले होते. तर भारताचे 4 जवान जखमी झाले होते. दरम्यान सैन्याने कुणीही जखमी झाल्याची माहिती दिली नव्हती.

8 जानेवारीला चिनी सैनिक पकडला गेला
8 जानेवारी रोजी एका चिनी सैनिकाला भारतीय हद्दीत घुसल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते. ही घटना पूर्व लडाखमधील पँगॉग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील भागातील होती. 2 दिवसांनी भारताने चिनी सैनिकाला परत पाठवले होते. आपला सैनिक चुकून भारतीय हद्दीत गेला, असे चीनने स्पष्ट केले होते. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.

बातम्या आणखी आहेत...