आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडनी:चीन भांडखाेर होत आहे, भारताने इतर राष्ट्रांत स्थान निर्माण करावे, ऑस्ट्रेलियाचे विशेष व्यापार दूत टोनी अबॉट यांचा लेख

सिडनी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी लिहिले की भारत जगातील एक उदयोन्मुख लोकशाही महाशक्ती आहे. या देशाने वैश्विक प्रकरणांत आपले योग्य मित्र निवडून तेथे पोहोचण्याची गरज आहे. तर जगातील दुसरी उदयोन्मुख (चीन) शक्ती दिवसेंदिवस अधिक भांडखोर होत आहे. त्यामुळे भारताने शक्य तितक्या लवकर राष्ट्रांमध्ये आपले योग्य स्थान घ्यावे, हे सर्वांसाठीच गरजेचे बनले आहे.

टोनी अबॉट सध्या ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे विशेष व्यापार दूत आहेत. त्यांनी नुकताच ‘द ऑस्ट्रेलियन’ नावाच्या वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. यात भारत आणि ऑस्ट्रेलियातील नात्यावर विस्ताराने लिहिले आहे. शिवाय भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करारावरही भर दिला आहे. यात त्यांनी चीनच्या भूमिकेचा निषेध करून चीनपासून दूर राहण्याची सूचना केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘व्यापार करार हे राजकारणासोबत अर्थशास्त्राविषयी आहेत.’

बातम्या आणखी आहेत...