आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय सैन्यासमोर चीनने उतरवले रोबोट:LAC वर तिबेटची थंडी चिनी सैनिकांना सहन होईना! ड्रॅगनने निगरानीसाठी उतरवली रोबोट सेना

ल्हासा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सैन्याच्या जवानांचा सामना करणे लडाखमध्ये भयानक थंडीने थरथरणाऱ्या चीनी सैनिकांना शक्य होणार नाही. त्याऐवजी चीनने आपली रोबो आर्मी आणि मानवरहित वाहने त्यांच्यासमोर उभी केली आहेत. तिबेटच्या कडाक्याच्या थंडीचा सामना करु न शकणाऱ्या सैनिकांना वाचवण्यासाठी ड्रॅगनने हे काम केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनने तिबेट आणि लडाख सीमेवर डझनभर स्वयंचलित आणि रोबोटिक वाहने तैनात केली आहेत. भारतीय लष्कराशी नुकत्याच झालेल्या चकमकीत चिनी सैनिकांना थंडीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर हे उघड झाले की चिनी सैन्य बर्फाच्छादित भागात युद्धासाठी पूर्णपणे तयार नाही.

तिबेटमध्ये तैनात ऑटोमेटिक 88 शार्प क्लॉ व्हीकल्स

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने तिबेटमध्ये 88 ऑटोमेटिक शार्प क्लॉ व्हीकल्स तैनात केली आहेत. यामध्ये लडाख सीमेवर 38 शार्प क्लॉ वाहने लडाख तैनात करण्यात आली आहेत. ही वाहने चिनी शस्त्रास्त्र उत्पादक कंपनी NORINCO ने बनवली आहेत. याचा उपयोग परिसराच्या निगराणीसाठी तसेच शस्त्रे आणि आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी केला जाईल.

रोबोटप्रमाणे लढू सकते ऑटोमेटिक Mule-200 व्हीकल्स

चीनने तिबेटमध्ये ऑटोमेटिक Mule-200 मानवरहित वाहनेही तैनात केली आहेत. अवघड भागात पाळत ठेवण्यासोबतच ही वाहने 50 किमीपर्यंत हल्ला करू शकतात. याशिवाय एकावेळी 200 किलोपेक्षा जास्त दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे यावरून वाहून नेली जाऊ शकतात. वायरलेसद्वारे नियंत्रित होणारी ही वाहने रोबोटप्रमाणे लढू शकतात. सध्या तिबेटमध्ये 120 Mule-200s आहेत, त्यापैकी बहुतांश भारतीय सीमेजवळ तैनात आहेत.

VP-22 गाड्या अॅम्बुलेंसप्रमाणेही वापरली जाऊ शकतात
PLA जवळ सैनिसांना घेऊन जाण्यासाठी VP-22 माइन रेसिस्टेंट एम्बुश प्रोटेक्टेड व्हीकल्सही आहेत. यांचा वापर अॅम्बुलेंसप्रमाणेही केली जाऊ शकतो. या गाड्यांनी एका वेळी 15 लोकांना ट्रान्सफर केले जाऊ शकते. सध्या तिबेटमध्ये 77 VP-22 आहेत. ज्यामध्ये 47 च्या जवळपास भारतीय सीमेजवळ तैनात आहेत.

लडाख बॉर्डरच्या जवळ तैनात आहेत 150 लिंक्स ऑल-टेरेन वाहन

तिबेटमध्ये 200 लिंक्स ऑल-टेरेन वाहने देखील आहेत. याद्वारे एकावेळी 15 लोकांना ट्रान्सफर करता येऊ शकते. यासोबतच ते अवजड शस्त्रे आणि हवाई संरक्षण शस्त्रांसाठी प्लॅटफॉर्म म्हणूनही काम करू शकतात. सध्या 150 लिंक्स ऑल-टेरेन लडाखमध्ये आहे.

लडाखमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून तणाव कायम आहे
लडाखमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू आहे. यादरम्यान गलवानमध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. चीनचे 40 हून अधिक सैनिकही मारले गेले होते, परंतु त्यांनी त्यांची नेमकी संख्या सांगितली नव्हती. याशिवाय भारत आणि चीनचे सैनिकही या भागात आपसात भांडत राहिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...