आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेजारील देशांच्या जमिनी बळकावण्याच्या आपल्या विस्तारवादी धोरणापासून चीन हटतांना दिसत नाहीये. या अंतर्गत तो नेपाळच्या जमिनीवर सातत्याने बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत आहे. नेपाळमधील गोरखा जिल्ह्यातील रुईला येथे दोन वर्षांपूर्वी चीनने लष्करी तळ बांधलेल्या जागेला आता काटेरी तारांनी वेढा घातला आहे.
हिमालयीन प्रदेशात नेपाळ आणि चीन यांच्यातील सीमा अद्याप निश्चित झालेली नाही. याचा फायदा घेत चीन हळूहळू नेपाळच्या अंतर्गत भागात घुसखोरी करत आहे. नेपाळी लोक या कृतीचा सातत्याने निषेध करत आहेत, पण सरकारी अधिकारी मात्र त्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांना खबरच नाही...
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की सीमेवर कोणताही विकास करण्यापूर्वी दोन्ही देशांची परवानगी आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत चीन नेपाळच्या जमिनीवर कोणतेही बेकायदेशीर बांधकाम करत असल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
चार महिन्यांपूर्वी नेपाळ सरकारचा एक गुप्त अहवाल लीक झाला होता. त्यात चीनने नेपाळच्या दोन सीमावर्ती भागांवर कसा कब्जा केला आहे हे सांगितले आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार- चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA)नेपाळच्या दोन सीमावर्ती भागात घुसखोरी करून त्याठिकाणी पायाभूत सुविधा तयार करत आहे.
62 वर्षांचा जुना करार
दोन्ही देशांदरम्यान हिमालयाच्या बाजूने सुमारे 1400 किमीचा सीमावर्ती भाग आहे. 1960 मध्ये दोन्ही देशांमध्ये सीमेबाबत अनेक करार झाले. मात्र, हुमला वगळता अन्य जिल्ह्यातील खांब हटवून चीनने आता येथे कब्जा केला आहे. गेल्या वर्षी जेव्हा हे वाद चव्हाट्यावर आले तेव्हा नेपाळ सरकारने येथे टास्क फोर्स पाठवले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.