आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनचे उद्योगपती जॅक मा आणि त्यंाची कंपनी अलिबाबा व अँट ग्रुपविरुद्ध सुरू चीन सरकारची कठोर कारवाई लवकरच अन्य कंपन्यांवरही होऊ शकते. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अशा प्लॅटफॉर्म कंपन्यांविरुद्ध आणखी कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत, ज्यांनी डेटा आणि मार्केटच्या शक्तीवर ताबा मिळवला आहे. चिनी कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ वित्तीय सल्लागार आणि समन्वय समितीसोबतच्या बैठकीत शी जिनपिंग यांनी नियामकांना इंटरनेट कंपन्यांची निगराणी करणे आणि एकाधिकाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जिनपिंग यांनी निर्देश दिले की, बाजारात निरोगी स्पर्धेेला चालना दिली जावी आणि अवैध भांडवल विस्तार रोखला जावा. सीसीटीव्हीनुसार, काही प्लॅटफॉर्म कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीचा वापर केला आहे आणि यामुळे जोखीम आणखी वाढली आहे. शी जिनपिंग आणि त्यांच्या अधिनस्थांकडून असामान्य पद्धतीने कठोर शब्दांत केलेली टिप्पणी दर्शवते की, चिनी सरकार आपल्या सर्वात मोठ्या व शक्तिशाली खासगी कॉर्पाेरेशनचे पंख कापण्याच्या तयारीत आहे.
काय आहे प्लॅटफॉर्म आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी?
प्लॅटफॉर्म कंपनी शब्द अनेकदा मोबाइल आणि इंटरनेट कंपन्यांसाठी वापरला जात आहे. या कंपन्या कॅब सर्व्हिसपासून फूड डिलिव्हरी, ई-कॉमर्स, डिजिटल व्यवहार प्लॅटफॉर्मपर्यंतची सेवा देतात. या कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या कोट्यवधीत असते. यापैकी अब्जावधी डॉलरचा व्यापार होतो. यालाच प्लॅटफाॅर्म इकॉनॉमी म्हटले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.