आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात सामान्यपणे आंदोलनात अल्पवयीन, तरुण, वृद्ध सहभागी होतात. परंतु हाँगकाँगमध्ये २०१९ मध्ये सरकार व चीनविरोधी आंदोलनात ६ वर्षीय मुलांनी भाग घेतला होता. त्यावरून चीन सरकारने हाँगकाँगच्या मुलांच्या मनावर ताबा मिळवण्याचे ठरवलेले दिसते.
मुलांना राष्ट्रवादाचे शिक्षण देण्यासाठी नवी शैक्षणिक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार ६ वर्षीय मुलांना बाह्य शक्तींचा प्रभाव रोखण्यासाठी आणि देश इतरांच्या आधीन जाऊ नये यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.
प्राथमिक शाळेतील मुले राष्ट्रगीत कसे गावे, त्याचा सन्मान कसा करावा या गोष्टी शिकतील. पाेलिस व पीपल्स लिबरेशन आर्मी हाँगकाँगचे संरक्षक आहेत या गोष्टी शिक्षक मुलांना शिकवतील. त्याशिवाय दहशतवाद, फुटीरवाद इत्यादीबाबतही मुलांना माहिती देण्याच्या सूचनेचाही त्यात समावेश आहे. माध्यमिक विद्यालयात चार मुख्य गुन्हे कोणते आहेत या गोष्टी मुले माध्यमिक शाळेत असताना शिकतील. काही कायदेतज्ञांनी चीनच्या या नव्या सुरक्षा कायद्याला व्यापक परंतु अस्पष्ट संबोधले आहे. सरकारने एक शैक्षणिक कार्टून व्हिडिआेदेखील रिलीज केला आहे. त्यात एक व्यक्ती पदवीधराची हॅट परिधान केलेली व हाँगकाँगच्या आर्किटेक्चरबद्दल बोलत असताना दिसते. त्यातून चीन सरकारने केंद्र व राष्ट्रीय सुरक्षा कायद्याबद्दलच्या कर्तव्यांची माहितीही दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.