आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:चीनने व्हिडिओद्वारे अमेरिकेची उडवली खिल्ली, म्हणाले- आम्ही सावधान केले होते, पण त्यांनी ऐकले नाही

पॅरिस2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्रांसमध्ये चीनी दूतावासने जारी केला व्हिडिओ, व्हायरसची टाइमलाइनदेखील जारी केली होती
  • अॅनिमेटेड व्हिडिओत दाखवले की, चीनने व्हायरसची माहिती जगासमोर वेळेवर मांडली होती

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे अमेरिकेने नेहमी चीनला जबाबदार ठरवले आहे. यानंतर आता चीनने एक व्हिडिओ जारी करुन अमेरिकेची खिल्ली उडवली आहे. या व्हिडिओत दाखवले की, चीनने वारंवार अमेरिकेला कोरोनाबद्दल सांगितले होते, पण अमेरिकेने चीनचे म्हणने ऐकले नाही.

फ्रांसमधील चीनच्या अँबेसीने ट्विटरवर अॅनिमेटेड व्हिडिओ पोस्ट केला आहे. याचे टायटल ‘वंस अपॉन अ व्हायरस’आङे. या व्हिडिओमध्ये व्हायरसची टाइमलाइनदेखील दाखवण्यात आली आहे. व्हिडिओत कार्टूनच्या माध्यमातून चीनने व्हायरसबद्दल जगाला अनेकवेळा सांगितले, असे दाखवण्यात आले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा चीनला जबाबदार ठरवले आहे

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकवेळा चीनला जबाबदार ठरवले आहे. त्यांनी म्हटलंय की, व्हायरस वुहान इंस्टीटयूट ऑफ वायरोलॉजीमध्ये तयार करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी याचे पुरावे असल्याचा दावाही केला आहे. परंतू, पुरावे दाखवण्यात नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...