आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • China Nepal | KP Sharma Oli Nepal Politics News; Chinese Ambassador And Communist Party (NCP) Former Pm Madhav Kumar Meeting Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेपाळच्या राजकारणात चीनची उडी:चीनच्या अॅम्बेसेडर होउ यांगकी नेपाळच्या राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधानांना भेटल्या; मे महिन्यात यांगकी यांनीच वाचवले होते पीएम ओली यांचे पद

अनिल गिरी, काठमांडूवरुन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे पद धोक्यात, त्यांना चीनच्या जवळचे मानले जाते

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि सरकार संकटात आले आहे. ओली यांना चीनच्या जवळचे मानले जाते. आता परत एकदा हे सिद्ध झाले आहे. ओली सरकारला वाचवण्यासाठी बीजिंग आपल्या काठमांडू अॅम्बेसीमधून अॅक्टीव्ह दिसत आहे. येथे होउ यांगकी चीनी अॅम्बेसेडर आहेत. रविवारी त्यांनी संपूर्ण दिवस सत्तेतील नेत्यांच्या भेटी घेतल्या. शुक्रवारी राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांची भेट घेतली होती. यापूर्वी मे महिन्यातही ओली सरकार पडण्याच्या स्थितीत आले होते. तेव्हादेखील होउ यांगकी यांनी विरोधी नेत्यांची भेट घेऊन सरकार वाचवले होते.

दोन मोठ्या नेत्यांची भेट

अशा वेळी जेव्हा चीन आणि भारतादरम्यान तणाव सुरू आहे. चीनसाठी नेपाळमध्ये आपल्या जवळची सरकार असणे गरजेचे आहे. यामुळेच होउ यांगकी खूप अॅक्टिव दिसत आहेत. शुक्रवारी त्यांनी राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांची भेट घेतली. भंडारी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या होत्या.  रविवारी यांगकींनी माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ यांचीही भेट घेतली.

माधव आणि भंडारी यामुळे आहेत खास

बिद्या देवी भंडारी राष्ट्रपती असल्या, तरीदेखील त्यांच्या मताला पक्षात मोलाचे स्थान आहे. तर, माधव कुमार पंतप्रधान ओलींचे कट्टर विरोधी आहेत.  यांगकी या दोन्ही नेत्यांना एकत्र आणून ओली यांचे पद वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळच्या राजकारणात चीनची दखल किती आहे, यावरुन अंदाज लावता येऊ शकतो की, यांगकी यांच्या भेटीगाठी लपवून ठेवल्या नाहीत.  

बातम्या आणखी आहेत...