आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चीनमध्ये मुलांवरील होमवर्कचे ओझे घटल्यावर महिन्यात 33 हजार स्पोर्ट्‌स-आर्ट्‌स क्लब उघडले, स्पोर्ट्‌ससाठी जास्त गुण पद्धती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारच्या आदेशानंतर शाळांनी असाइनमेंट कमी केल्या, खासगी ट्यूशनही बंद

चीनमध्ये मुलांच्या डोक्यावरील होमवर्कचे ओझे आणि शाळाबाह्य ट्युशन बंद केल्यामुळे क्रीडा आणि आर्ट्‌स क्लबचा पूर आला आहे. जुलैच्या अखेरीस चीन सरकारने शाळकरी मुलांसाठी हे धोरण सुरू केले होते. शाळांना असाइनमेंट कमी करण्याचे आदेश बजावले, त्यामुळे मुलांना यापेक्षा जास्त वेळ लावावा लागला नाही. प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, या धोरणाच्या जवळपास एका महिन्यानंतर ३३ हजार आर्ट्‌स आणि स्पोर्ट्‌स क्लब सुरू झाले. तरुणाईचे आरोग्य सुधारणे आणि कामगार शक्तीस नव्याने पुनर्गठीत करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. एवढेच नव्हे तर शाळा आता विद्यार्थ्यांच्या कामगिरीत क्रीडा आणि अन्य उपक्रमांसाठी गुण वाढवत आहेत. सरकारने सिनियर हायस्कूल प्रवेश परीक्षेत शाळांचा स्कोअर आणखी वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

द. राज्य हैनानने मुलांना अतिरिक्त गुणांसाठी पोहणे, सॉकर, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलसारखे पर्याय दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांच्या पालकांनी एेच्छिक क्लोससचा शोध सुरू केला. बीजिंगमध्ये बॉक्सिंग क्लब चालवणारे जियानवे यांच्या म्हणण्यानुसार, नुकतेच त्यांच्याकडे मुलांच्या कोर्सबाबत येणाऱ्या कॉल्सच्या संख्येत अचानक वाढली आहे. जेनी लियू सात वर्षांच्या मुलाची आई आहे. त्यांनी गेल्या महिन्यात मुलाला स्पोर्ट्‌स क्लबमध्ये टाकले. त्यांच्या म्हणण्यानुसार, नव्या धोरणानुसार त्यांचा मुलगा गुओगुओ खेळू शकतो.

चीनमध्ये दर पाचपैकी एक मुलगा लठ्ठ, डोळ्यांच्या आजारांचे बळी
चीनचे राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार देशाची तरुण पिढी लठ्ठ, डोळ्यांचे आजार आणि नैराश्याने त्रस्त होत आहेत. निम्म्याहून जास्त शाळकरी मुलांवर दृष्टी दोषाचा परिणाम झाला आहे. ६ ते १७ वयोगटातील पाचपैकी एक मुलगा लठ्ठपणाचा बळी ठरला आहे. यामुळे सरकारने ५ वर्षांत २ कोटी जणांना व्यायामात सामावून घेतले आहे.

व्हिडिओ गेम्सवर अंकुश : सरकारने व्हिडिओ गेम्स खेळण्यावर नियंत्रण वाढवले आहे. याच पद्धतीने आरामदायक जीवनशैली दाखवण्यावरही बंधने घातली आहेत.

बातम्या आणखी आहेत...