आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी अत्याचार:हेअर प्रॉडक्ट बनवण्यासाठी चीन करतोय उइगर महिलांचा छळ : अमेरिका

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • चिनी अत्याचारावर अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे काही महत्त्वाचे खुलासे

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) राॅबर्ट आे ब्रायन यांनी चीनमध्ये मानवाधिकाराच्या उल्लंघनावरून गंभीर दावा केला आहे. एस्पन इन्स्टिट्यूटच्या आॅनलाइन कार्यक्रमात ब्रायन बाेलत हाेते. झिनजियांग प्रांतात चीन सरकारची वागणूक नरसंहाराच्या उंबरठ्यावर असल्यासारखी आहे. सरकार उइगर मुस्लिमांवर अत्याचार करत आहे. तेथे भयंकर क्राैर्य दिसते, असा आराेपही ब्रायन यांनी केला. अमेरिकेच्या कस्टम विभागाने जूनमध्ये एका जहाजातून माेठ्या संख्येने हेअर प्राॅडक्ट जप्त केले. त्याचे उत्पादन झिनजियांगमध्ये केले जाते. ही उत्पादने तयार करण्यासाठी चीन सरकारने उइगर महिलांचे मुंडण केल्याची माहिती नंतर मिळाली. अमेरिका या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. आम्ही मानवी हक्काचे समर्थक असू तर आपण सर्वांनी चीनच्या वर्तनाबाबत अधिक सतर्कता बाळगायला हवी, असे ब्रायन यांनी सांगितले.

झिनजियांगमध्ये बळजबरी नसबंदी, गर्भपात

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाॅम्पियाे यांनी एका अहवालाच्या आधारे जूनमध्ये झिनजियांगमधील स्थितीबद्दल वक्तव्य केेले हाेते. या प्रांतात उइगर मुस्लिमांची बळजबरी नसबंदी व गर्भपात केला जात आहे. येथील निर्वासितांच्या छावण्यांत १० लाखांवर मुस्लिमांना कैद करण्यात आले आहे. या छावण्यांत मुस्लिमांची हत्यादेखील केली जाते. झिनजियांगची रहिवासी असलेल्या एका महिलेने अमेरिकेतील राजकीय नेत्यांना अत्याचाराची हकिगत सांगितली हाेती. २०१८ मध्ये तिची छावण्यांतून सुटका झाल्याचे तिने सांगितले हाेते. चिनी अधिकाऱ्यांनी माझा छळ केल्याची तिने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...