आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आंतरराष्ट्रीय सहमतीआधी चीनने केली ‘ऑपरेशन तैवान’ची तयारी

लंडन/वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमधील राजकीय सूत्रांनुसार, तैवानच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय सहमती तयार होण्याआधी आपल्याकडे तैवानवर हल्ला करण्यासाठी ४८ तासांचा अवधी आहे, असे चीनने म्हटले आहे. त्या अवधीत चिनी लष्कराला तैवानची खाडी ओलांडणे, त्याच्या भूभागावर पोहोचणे आणि तैवानमध्ये राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला बाजूला करावे लागेल.

सूत्रांनुसार, तैवानचा भूभाग पुन्हा आपल्यात विलीन व्हावा, अशी चीनची इच्छा आहे. जिनपिंग यांनी तैवानवरील आपला दावा सोडून दिल्यास यानंतर कोणताही राष्ट्राध्यक्ष तैवानवर कब्जा करू शकणार नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे जिनपिंग तैवानला एका सार्वभौम देशाच्या रूपात राहू न देता हल्ला करेल. अशी संघर्षाची स्थिती कधी येईल,असा प्रश्न आहे. चिनी लष्कराने २०२७ मध्ये तैवानला ताब्यात घेण्यासाठी तयार राहावे,असे जिनपिंग यांना वाटते. याचा अर्थ असा नाही,की तेव्हा युद्ध होईल. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील प्रभारी पेंटागॉनचे वरिष्ठ अधिकारी एली रॅटनर म्हणाले, या दशकअखेरीस काहीही होण्याची शक्यता नाही. चीन सध्या युक्रेन युद्ध समाप्त होण्याची वाट पाहील. त्याची भविष्यातील रणनीती अस्पष्ट आहे. चिनी लष्कर विस्तार करत आहे,हे जाणून आहोत. ब्रिटनचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफनुसार, चीनचे नौदल दर चार वर्षांत ब्रिटनच्या रॉयल नेव्हीएवढ्या आकाराने वाढत आहे. अंतराळ, सायबर आणि भूभागावरही हेच होत आहे. त्याने १९७९ नंतर युद्ध लढलेले नाही. त्याने व्हियतनामवर शेवटचे युद्ध केले होते.अशात चीनचे कनिष्ठ अधिकारी निर्णय घेण्यात सक्षम असतील असे म्हणू शकत नाहीत.

तैवान राष्ट्रपतींच्या अमेरिका दौऱ्यामुळे चीन संतप्त,८ युद्धनौकांसोबत कवायत सुरू तैपेई | तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन यांच्या अमेरिका दौऱ्यात स्पीकर मॅक्कार्थी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर चीन संतप्त झाला आहे. यानंतर त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने(पीएलए) तैवानजवळ लष्करी कवायत सुरू केली आहे. ही कवायत चीनच्या फुजियान राज्याच्या पिंगटन आयलँडजवळ ४ भागात सुरू झाली असून ती तीन दिवस चालेल. हा भाग तैवानच्या खूप जवळ आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, पिंगटन आयलँड क्षेत्रात चीनच्या ८ युद्धनौका आणि ४२ लढाऊ विमाने दिसली. ७ एप्रिलला चीनने २ लढाऊ विमानांसह ३ युद्धनाैका तैवानजवळ तैनात केल्या होत्या.

तैवानच्या स्वातंत्र्य समर्थक व साथ देणाऱ्यांनाही इशारा {चिनी लष्करानुसार, ही मोहीम तैवानचे स्वातंत्र्य हवे असणारे फुटीरतावादी, बाहेरच्या शक्तीसोबतचे साटेलोट करणारे आणि त्यांना चिथावणी देणाऱ्यांविरुद्ध कडक इशारा आहे.

{गेल्या उन्हाळ्यात अमेरिकेच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतरही चीनने ७ दिवसांची लष्करी कवायत केली होती. या कवायतीतून चीन संदेश देऊ इच्छित होता की, जसजशा अमेरिका आणि तैवानमध्ये राजकीय बैठका वाढतील चीनही लष्करी कवायत वेगवान करेल. वेगवान करेल. याचे कारण, नुकतेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांची अलीकडची भेट आहे.